कवठेकर प्रशालेत सन 2024-25 ची शिक्षक-पालक सभा पालकांच्या उदंड उत्साहात संपन्न
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशालेमध्ये शुक्रवार शिक्षक- पालक सभा मोठ्या उत्साहात पार पडली. सभेचा प्रारंभ सर्व मान्यवरांचे हस्ते सरस्वती पूजनाने झाला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही. वाय. पाटील यांनी केले.यामध्ये त्यांनी नवीन शैक्षणिक वर्षातील कामकाजाची रूपरेषा आणि मागील वर्षाच्या शैक्षणिक वर्षाची यशस्वी कामगिरीही पालकांच्या समोर मांडली.सन 2023-24 या वर्षातील पालक सभेचा इतिवृत्त प्रशालेच्या शिक्षिका सौ मोहिते यांनी प्रस्तुत केले
त्याचबरोबर सन 2024-25 या नूतन वर्षीच्या पालक सभेची माहिती व तिची रचना प्रशालेचे सहशिक्षक व नूतन सचिव श्री शिवाजी मेडशिंगकर यांनी स्पष्ट केली.तद्नुसार शिक्षक-पालक सभेचे नूतन उपाध्यक्ष म्हणून श्री अमोल घाटे यांची तर सहसचिवा म्हणून सौ.माधुरी बडवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही. वाय. पाटील यांनी मावळते उपाध्यक्ष ह.भ.प.श्री नामदास महाराज नूतन उपाध्यक्ष श्री अमोल घाटे यासर्वांचा सत्कार केला.तर नूतन सहसचिवा सौ.माधुरी बडवे व पंढरपूररातील ज्येष्ठ आरोग्यतज्ञा डॉ सौ वर्षा काणे यांचा सत्कार ज्येष्ठ पर्यवेक्षिका सौ एस.आर.कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी त्यांनी उपस्थित सर्व भगिनी पालकांना आरोग्याविषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.अभ्यागतांच्या मनोगतांमध्ये श्री अमोल घाटे यांनी प्रशालेच्या आजपर्यंतच्या कामगिरीचा गौरवपर उल्लेख केला व प्रशालेस पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली तर सौ माधुरी बडवे यांनीही प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षक व पालक यांच्यामधील दुवा असल्याचे प्रतिपादन केले.प्रशालेच्या विविध उपक्रमाची माहिती पर्यवेक्षिका सौ एस आर कुलकर्णी यांनी दिली व प्रशालेत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा व परीक्षा यांचे महत्व विशद केले.यावेळी पालकांनी उपस्थित केलेल्या अडचणींचे निवारण मा.मुख्याध्यापक श्री व्ही वाय पाटील यांनी समाधानकारकपणे केले.कार्यक्रमाचा समारोप प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री मुंढे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला .तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती उत्पात-कुलकर्णी यांनी केले.या कार्यक्रमास जवळपास सहाशे पालक बंधू-भगिनी उपस्थित होते.व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.