स्वेरीचे उपक्रम हे विद्यार्थ्यांसाठी लाभदायक – आर. एस. व्ही. पी.चे योगेश बिजलानी
पंढरपूर प्रतिनिधी
स्वेरीच्या संशोधन विभागाला दिली बिजलानी व गाडगीळ यांनी सदिच्छा भेटपंढरपूर- ‘स्वेरीचा कॅम्पस, शैक्षणिक उपक्रम व कल्चर पाहता ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात संशोधनाचे जाळे विणलेले पाहून विद्यार्थ्यांचे तंत्रज्ञानातील योगदान हे करिअर करताना महत्वाचे ठरणार आहे यात शंका नाही.’ असे गौरवोदगार आर. एस. व्ही. पी. (गव्हर्मेंट ऑफ इंडिया) चे योगेश बिजलानी यांनी काढले गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॅम्पसला गव्हर्न्मेंट ऑफ इंडियाच्या प्रिन्सिपल सायंटीफिक अॅडव्हायजर ऑफीसच्या आर. एस. व्ही. पी. (रुटॅग स्मार्ट व्हिलेज प्रोग्राम) चे योगेश बिजलानी, डिसॉल्ट सिस्टम फाउंडेशनचे प्रोग्राम डायरेक्टर हेमंत गाडगीळ व इतर मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी सल्लागार बिजलानी गौरवोदगार काढत होते. ‘१९९८ साली स्वेरीने ग्रामीण भागात तंत्रशिक्षणाची मुहूर्तमेढ पंढरीच्या पायथ्याशी अर्थात गोपाळपूरमध्ये रोवली त्यामुळे पंढरीच्या शैक्षणिक वैभवात आणखी भर पडली असून अफाट परिश्रम घेत आज स्वेरीच्या बीजाचे रुपांतर वटवृक्षात झाले आहे. स्वेरीच्या शैक्षणिक व सामाजिक अशा अनेक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धीक विकासास हातभार लागत आहे. स्वेरीचे शिक्षण क्षेत्रातील योगदान जसजसे लक्षवेधी ठरत आहे तसतसे माळरानावरील या शैक्षणिक संकुलाला भेट देणाऱ्यांची संख्याही दिवसोंदिवस वाढत आहे. अशात कॅम्पसला आर. एस.व्ही.पी.चे योगेश बिजलानी, डिसॉल्ट सिस्टम फाउंडेशन चे प्रोग्राम डायरेक्टर हेमंत गाडगीळ व इतर मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. संस्थेच्या वतीने यावेळी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. योगेश बिजलानी व हेमंत गाडगीळ यांनी संशोधन विभागाची प्रगती सविस्तरपणे जाणून घेतली. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एम. पवार यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली संशोधन विभागाला गती आली आहे. कॅम्पसमध्ये संशोधन कल्चर असल्यामुळे विद्यार्थ्यांचा कल देखील साहजिकच संशोधनाकडे अधिक असल्याचे जाणवते. यावेळी पाहुण्यांनी संशोधन विभागाबरोबरच इतर विभागांना भेट देऊन माहिती जाणून घेतली. उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, डॉ. हर्षवर्धन रोंगे, डॉ. एम.एम. आवताडे आदी प्राध्यापकांकडून संशोधन प्रकल्प, रुरल ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फॅसिलिटी (आरएचआरडीएफ), संशोधनासाठी मिळालेला निधी, शिक्षण पद्धती ट्रिपल पीई, स्वेरीमधील आंत्रप्रन्युअरशिप सुविधा व त्या अनुषंगाने असलेले उपक्रम, इफेक्टिव्ह टीचिंग-लर्निंग स्कीम, नाईट स्टडी, महाविद्यालयाला मिळालेली विविध मानांकने, स्पर्धा परीक्षेची तयारी, प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी घेतलेली गरुड झेप, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्राणायम, आर्ट ऑफ लिव्हिंग सारखे प्रशिक्षण, विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यातील आदरयुक्त शिस्त व मिळत असलेले संस्कार, विविध शैक्षणिक, विधायक व सामाजिक उपक्रमांची माहिती जाणून घेतली.
स्वेरीच्या कॅम्पसला गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या आर. एस. व्ही. पी.चे योगेश बिजलानी, डिसॉल्ट सिस्टम फाउंडेशन चे प्रोग्राम डायरेक्टर हेमंत गाडगीळ व इतर सहकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी डावीकडून हेमंत गाडगीळ, योगेश बिजलानी, डॉ. हर्षवर्धन रोंगे,, इतर सहकारी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.डी.ए.तंबोळी आदी. तसेच हेमंत गाडगीळ, योगेश बिजलानी व पाहुण्यांना प्रकल्पांची महिती देताना डॉ. एम.एम. आवताडे.