सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योजना पोहोचविण्यात हलगर्जी पणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय करणार नाही – आमदार आवताडे
पंढरपूर प्रतिनिधी
दुसऱ्यांदा आमदार पदी विराजमान झाल्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील प्रशासनाची पहिली आढावा बैठक घेत अधिकाऱ्यांनी गतिमान प्रशासन चालवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे, शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवून शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनेचा लाभ द्या या कामात हलगर्जीपणा दिसून आला तर मी कुणाचीही गय करणार नाही. जे ठेकेदार टेंडर घेऊन काम न करता बसले आहेत त्यांना तात्काळ काळ्या यादीत टाका अशी तंबी प्रशासनास देत यापुढे दर महिन्याला प्रत्येक विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेतला जाईल, कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.मंगळवेढा येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये प्रशासनातील सर्व खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती यावेळी आमदार आवताडे बोलत होते या बैठकीला माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, प्रांतअधिकारी बी आर माळी, तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी योगेश कदम, जिल्हा दूध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर,माजी सभापती तानाजी काकडे,माजी उपसभापती सुरेश ढोणे,रामेश्वर मासाळ, माऊली कोंडुभैरी,प्रकाश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.या आढावा बैठकीमध्ये आमदार समाधान आवताडे यांनी प्रत्येक विभागाच्या खाते प्रमुखांकडून त्या त्या विभागातील कामाचा आढावा घेतला योजनेच्या अंमलबजावणी मध्ये आपल्याला काही अडचणी येतात का?,इतर काही साधनसामुग्रीची कमतरता आहे का?काम करण्यास तुमच्या काही अडचणी आहेत का ? याची सविस्तर माहिती घेण्यात आली यावेळी पंचायत समिती बांधकाम खात्याकडे निविदा स्तर कामे किती? पूर्ण किती? अपूर्ण किती? सुरू न झालेली किती याची माहिती घेऊन ज्या ठेकेदाराने टेंडर घेऊन सहा महिने काम सुरू केले नाही त्या ठेकेदारांना आजच्या आज नोटिसा काढून ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा सूचना देण्यात आल्या,कृषी विभागाला विम्यामध्ये बोगसगिरी होत असून बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने येणाऱ्या काळात टंचाई जाणवण्याची शक्यता असून त्यांचा आराखडे तात्काळ तयार करून पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या त्याचबरोबर काही ठिकाणी जलजीवनच्या कामांमध्ये निकृष्ट कामे झाल्याच्या तक्रारी आहेत अशा कामांना मी स्वतः भेटी देणार असल्याचेही आमदार अवताडे यांनी सांगितले.एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाने लेक लाडकी आणि अंतर्गत 252 लाभार्थ्यांना लाभतर लाडकी बहीण अंतर्गत 54257 लाभार्थ्यांना लाभ दिल्याचे सांगितले. पशुसंवर्धन विभागाअंतर्गत जनावरांची जनगणना होत असून प्रत्येकाच्या घरी जाऊन अचूकपणे जनगणना करण्याच्या सूचना देण्यात आल्या, शिक्षण व आरोग्य विभागाकडून अनेक पदे रिक्त असून ती पदे तात्काळ भरण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी मागणी आमदार अवताडे यांच्याकडे केली तर मंगळवेढा तालुक्यामध्ये 108 नंबर वर अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी 2 अंबुलन्स उपलब्ध आहेत यातील भोसे येथील अंबुलन्स सुरू असून मंगळवेढा येथील ॲम्बुलन्स ला डॉक्टर नसल्याने अपघात असताना मदत करण्यासाठी ही गाडी जात नाही त्या ठिकाणी तात्काळ डॉक्टरची भरती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.पंचायत समिती अंतर्गत विविध योजनांसाठी ग्रामपंचायत च्या ग्रामसभा ठरावाची आवश्यकता असते अनेक गावांमध्ये ग्रामसेवक हे ग्रामसभा घेत नसून काही ठराविक लोकांची नावे घालून बोगस ठराव देत आहेत याला आळा घाला अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल अशा सूचना गट विकास अधिकारी योगेश कदम यांना आमदार अवताडे यांनी दिल्या नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेत असताना अनेकांनी नगरपालिकेच्या कारभाराविषयी तक्रारी केल्या गटारी तुंबल्या आहेत साथीचे रोग वाढत आहेत एका कुटुंबात अनेक घरकुले दिली आहेत मुख्याधिकारी कसलेही लक्ष घालत नाहीत अशी तक्रार एका नागरिकांने केली असता आमदार अवताडे यांनी तुम्हाला मंगळवेढ्याचे काम झेपत नसेल तर जागा मोकळी करा जबाबदार अधिकारी काम करण्यासाठी येईल असे म्हणत आठ दिवसात कामकाजात सुधारणा करा अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल अशी तंबी मुख्याधिकाऱ्यांना दिली.भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे बिल हे कोटीच्या घरात गेले असून शिखर समितीला ही योजना चालवणे शक्य नसूनशिखर समिती रद्द करून ही योजना शासनाकडे हस्तांतर करा अशी मागणी यावेळी करण्यात आली याचबरोबर महावितरण विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून मी मंजूर करून आणलेले ट्रांसफार्मर हे ठेकेदार आम्ही मंजूर करून आणतो असे सांगून शेतकऱ्यांकडून पैसे लुबाडत आहेत यावर संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अन्यथा मला माझ्या पद्धतीने तुमच्यावर लक्ष द्यावे लागेल असा इसारा महावितरण विभागाला देत जर कोणत्या शेतकऱ्याकडून पैशाची मागणी केली तर गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम महावितरण अधिकाऱ्यांना दिला याचबरोबर म्हैसाळ योजना भूमी अभिलेख सहाय्यक निबंधक आगार व्यवस्थापन क्रीडा अधिकारी राज्य उत्पादन शुल्क अन्न औषध प्रशासन भूजल सर्वेक्षण वनविभाग महसूल विभाग आदी विभागांचा आढावा घेत कामात गतिमानता आणा मी अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा प्रत्येक विभागाची स्वतंत्र आढावा बैठक लावून दर महिन्याला कामात किती सुधारणा झाली हे पाहणार आहे व कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार नाही असा इशारा आ आवताडे यांनी बैठकी प्रसंगी दिला