सहकार शिरोमणी कारखान्यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट
भाळवणी पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साख्र कारखान्यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांचे भरारी पथकाने भेट देवुन, त्यांनी कारखान्याकडे ऊस वाहतुक करणारे बैलगाडी/ट्रक-ट्रॅक्टर/बजॅट यांना अपघात होवु नये या सुरक्षेच्यादृष्टीने आलेल्या प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी ट्रॅक्टर ड्रायव्हर यांना मार्गदर्शन केले. कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस तोडणी वाहतुक करणारे बैलगाडी/ टॅक्टर/ बजॅट यंत्रणेस सुरक्षेच्या दृष्टीने कारखान्याने रिफ्लेक्टर / रेडियम रिप्लेक्टर बसविणेची व्यवस्था केली असून, सदर कामी कारखाना साईटवर आलेले प्रादेशिक परिवहन अधिकारी पांढरे यांचा सत्कार कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर यांनी केला. तसेच असि.प्रादेशिक परिवहन अधिकारी सलगर यांचा सत्कार सभासद नारायण शिंदे यांनी केला आणि आश्विनी पाटील असि.प्रादेशिक परिवहन अधिकारी व त्यांच्या इतर स्टाफ इ. सत्कर कारखान्याचे वतीने करण्यात आला.यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांनी ऊस वाहतुक करणारे ड्रायव्हर यांना वाहनाच्या पुढील व मागील बाजुस कापडी रिप्लेक्टर बसविण्यात यावे तसेच रेडियम पट्टी मागील येणाऱ्या वाहनास दिसेल अशा ठिकाणी लावावी जेणेकरुन अपघात टाळता येईल अशी माहिती सर्व ड्रायव्हर यांना देण्यात आली. त्यांच्या सुचनांचे पालन करुन कारखान्याकडे असलेल्या वाहनांना रिप्लेक्टर बसविण्यात आले आहे.यावेळी कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे, डेप्यु.जनरल मॅनेजर के.आर कदम, शेती अधिकारी प्रतापराव थोरात, परचेस अधिकारी सी.जे.कुंभार, सर्व ॲग्री ओव्हरसिअर, केनयार्ड सुपरवायझर डी.डी.काळे, कार्यालयीन अधिक्षक ज्ञानेश्वर कुंभार, सुरक्षा अधिकारी मनसुब सय्यद, वाहन ड्रायव्हर व कर्मचारी उपस्थित होते.