सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे वजन काटे बिनचुक वैद्यमापन भरारी पथका कडून शिक्का मोर्तब

भाळवणी :- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याला वैद्यमापन विभागाच्या भरारी पथकाने अचानक भेट देवुन, कारखान्याच्या सर्व वजन काट्यांची तपासणी केली. त्यांनी केलेल्या तपासणीत कारखान्याचे सर्वच वजनकाटे बरोबर व बिनचुक असल्याचे त्यांच्या तपासणीत निश्चित झाले. तसा अहवाल वैद्यमापन शास्त्र पंढरपूर विभागाचे निरिक्षक सी.बी.गायकवाड, सहकारी संस्था (साखर), लेखा परिक्षक एस.आर.आडम, भाळवणीचे मंडल अधिकारी आर.अे. शिंदे यांच्या पथकाने कारखाना व्यवस्थापनास दिलेला आहे. त्यामुळे कारखान्याचे वजनकाटे बिनचुक असल्याचे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यावर 60 टनी 2 व 10 टनी 2 असे चार वजनकाटे आहेत. या काट्यांवर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या ऊसाचे वजन आजतागायत पारदर्शक पध्दतीने करण्यात आलेले आहे, दरवर्षी वैद्यमापन विभागाचे भरारी पथक कारखान्यावर काटा तपासणीसाठी येत असते. चालु गळीत हंगाम 2024-25 मध्ये सदर काट्यांची तपासणी करण्यासाठी वैद्यमापन पथकाने अचानक कारखान्यावर भेट देवुन सर्व वजनकाट्यांची तपासणी करण्यासाठी वजनकाट्यावरुन वजने करुन गव्हाणीकडे गेलेल्या ट्रॅक्टर व बैलगाड्यांना परत बोलावुन फेरवजन केले. पुर्वी व दुबार वजन केलेल्या वाहनांच्या वजनामध्ये तफावत नसल्याचे आणि कारखान्याचे चारही वजनकाटे योग्य् व बिनचुक असल्याचे या पथकास निदर्शनास आले. कारखान्याचे वजनकाटे बरोबर असल्याचा अहवाल भरारी पथकाने दिल्यामुळे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची सहकार शिरोमणी कारखान्यावरील विश्वासहर्ता कायम राहिली असल्याची माहिती कार्यकारी संचालक पोपटराव घोगरे यांनी दिली. यावेळी भरारी वैद्यमापन पथकामध्ये वैद्यमापन निरिक्षक सी.बी.गायकवाड, सहकारी संस्था (साखर), लेखा परिक्षक एस.आर.आडम, भाळवणीचे मंडल अधिकारी आर.अे. शिंदे, ग्रामिण पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबर ढोबळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे, वर्क्स मॅनेजर पी.टी.तुपे, शेती अधिकारी प्रतापराव थोरात, परचेस अधिकारी सी.जे.कुंभार, केनयार्ड सुपरवायझर डी.डी.काळे, शेती व केनयार्ड विभागातील कर्मचारी कर्मचारी उपस्थित होते.
