पंढरपूर आगारात प्रवासी दिन साजरा, ग्राहक पंचायतीतर्फे चालक,वाहक यांचा केला गौरव

पंढरपूर – अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे पंढरपूर बस स्थानकावर रथसप्तमी हा दिवस राष्ट्रीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी आगार प्रमुख योगेश लिंगायत होते. प्रारंभी राज्य परिवहन महामंडळाचे सहा.वाहतूक अधिक्षक नवनाथ दळवे यांनी सर्वांचे स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते ग्राहक पंचायतीचे आराध्य दैवत स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक पंढरपूर तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये यांनी केले. ग्राहक पंचायतीचे सोलापूर जिल्हा संघटक दीपक इरकल यांनी प्रवासी दिन साजरा करण्याबाबतचा हेतू विषद करून रथसप्तमीचे महत्त्व सांगितले व प्रवासी हा महामंडळाचा आत्मा असून त्यांना अधिकाधिक चांगली सेवा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी प्रवाशांना चांगली सेवा उपलब्ध होण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी नविन बस गाड्या लवकर उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी केली. या प्रसंगी दर्शन बसमध्ये प्रवाशांची रोख रक्कम व दागिन्यासह विसरलेली बॅग आगारात जमा करून, प्रवाशांची ओळख पटवून परत केली या उत्कृष्ट प्रवासी सेवेबद्दल पंढरपूर आगाराचे चालक पांडुरंग साहेबराव पवार ४७१, वाहक ज्ञानेश्वरी भागवत पाटील १२६९२४ यांचा तसेच वरीष्ठ सहाय्यक समाधान नाना मेटकरी यांच्या प्रशासकीय कामाबद्दल शाल,सन्मान चिन्ह,गौरव प्रमाणपत्र देऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे गौरव करण्यात आला.यावेळी ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव सुहास निकते,तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, जिल्हा सदस्य अण्णा ऐतवाडकर, पांडुरंग अल्लापूरकर,तालुका सदस्य सचिन कोळेकर,शाम तापडिया,राजू ऐनापुरे,पारखे,स्थानक प्रमुख अंकुश सरगर व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रवासी, चालक,वाहक,कर्मचारी यांना तिळगूळ वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आगार प्रमुख योगेश लिंगायत यांनी नवीन बसेस मिळविण्यासाठी प्रयत्न चालू असून,प्रवाशांना चांगली सेवा देणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन श्री नवनाथ दळवे यांनी केले तर आभार सागर शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी रा.प.महामंडळाचे सुमित भिंगे,अप्पा अष्टेकर, विजया भूमकर इ.नी परिश्रम घेतले.
