संघर्ष केल्या शिवाय पत्रकारांचे प्रश्न सुटणार नाहीत जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार यांचे प्रतिपादन पत्रकार सुरक्षा समितीची बेगमपूर येथे बैठक

सोलापूर(प्रतिनिधी )
पत्रकार सुरक्षा समिती मोहोळ तालुका ची बेगमपूर येथे बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष सागर पवार होते राज्यातील पत्रकारांचे प्रश्न दिवसेंदिवस कठीण होत चाललले असून पत्रकारांनी एकत्र येऊन संघर्ष केल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत असं प्रतिपादन पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार यांनी केलं असून सदर बैठकित ते बोलत होते अमर पवार पुढे म्हणाले की


पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेल्या आठ वर्षापासून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना विमा योजना आरोग्य योजना यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील youtube व पोर्टल ला शासकीय मान्यता खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी अधिस्वीकृती पत्रिका मधील शिक्षणाचे अट आठवी पास करणे पत्रकारावर होणारे हल्ले धमकी मारहाण त्याचबरोबर राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे ही पत्रकार सुरक्षा समिती राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध असून पत्रकारांनी आपल्या प्रश्नाबाबत एकत्र येऊन संघर्ष करायला हवा असे पत्रकारांना आवाहन जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार यांनी केलं असून या बैठकीला प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा सरचिटणीस बंडू तोडकर दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद मोहोळ तालुका उपाध्यक्ष शुक्राचार्य शेंडेकर तालुका सचिव शहाजी शिंदे तालुका प्रसिद्धी प्रमुख महादेव शेवाळे अतुल भोई अजय तोडकर उपस्थित होते.