सामाजिक

रुक्मिणी मातेच्या चरणावर शनिवारी होणार वज्रलेप

24 मराठी न्यूज पंढरपूर प्रतिनिधी

पंढरपूर- श्री रुक्मिणी मातेच्या चरणाची झीज झाली असल्याने शनिवार, ११ रोजी यावर वज्रलेप अर्थात रासायनिक प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाचे रसायनतज्ज्ञ उप अधीक्षक, सदर वज्रलेपाची प्रक्रिया करणार आहेत.

श्री विठ्ठल व रुक्मिणी मूर्ती संवर्धनासाठी मागील वर्षी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही मूर्तीवर वज्रलेप केला होता. परंतु मे २०२२ रोजी रुक्मिणी मूर्तीच्या पायांची मोठ्या प्रमाणात झीज झाल्याचे समोर आले. यानंतर ८ मे रोजी औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाने पाहणी करून १० मे रोजी मंदिर समितीस या विषयीचा अहवाल सादर केला. त्यानुसार १२ मे च्या मंदिर समितीच्या बैठकीत रुक्मिणीच्या चरणावर पुन्हा वज्रलेप करण्याचा निर्णय झाला होता.

१० जुलै रोजी आषाढी एकादशी असून वारीपूर्वीच रासायनिक प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे औसेकर महाराज यांनी जाहीर केले होते.त्यानुसार शनिवार, ११ जून रोजी एकादशीस रात्री रुक्मिणीच्या चरणावर वज्रलेप होणार आहे. दरम्यान, पुरातत्त्व विभागाने केलेल्या पाहणीमध्ये श्री विठ्ठलाची मूर्ती पूर्णपणे सुस्थितीत असून श्री रुक्मिणी मातेची मूर्ती देखील चांगल्या स्थितीमध्ये आहे. केवळ चरणांची झीज झाली असल्याने यावर रासायनिक प्रक्रिया होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!