काँग्रेस नेते – राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईविरोधा त काँग्रेसच्या वतीने ,तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कारवाईच्या निषेधार्थ निवेदन.
24 मराठी न्यूज पंढरपूर (प्रतिनिधी)
सध्या देशाच्या राजकारणा बरोबरच राज्यातील राजकीय घडामोडी नी वातावरण दूषित होत आहे. देशाचे नेते मा श्री खासदार राहुल गांधी यांच्या विरुद्ध कारवाईच्या निषेधार्थ आज तहसीलदार यांना शहर काँग्रेस च्या वतीने निवेदन देण्यात आले. देशातील हुकूमशाही विरुद्ध आवाज उठवल्याने त्यांच्यावर सुड भावनेने केलेल्या कारवाईच्या विरोधात मोदी सरकारचा निषेध पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा श्री हनुमंतराव मोरे व शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा श्री अमर सूर्यवंशी व पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे निरीक्षक मा श्री भारत मगर साहेब यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तहसीलदार मा श्री सुशील जी बेलेकर यांना निवेदन देऊन भाजप सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. त्याप्रसंगी सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा श्री सूनंजय पवार, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा सुहास भाळवणकर सेवालाल पंढरपूर शहराध्यक्ष मा श्री गणेश माने, ओबीसी सेलचे सोलापूर जिल्हा माजी अध्यक्ष मा श्री समीर कोळी, किसान सेलचे तालुकाध्यक्ष अक्षय शेळके, पंढरपूर शहर उपाध्यक्ष नागनाथ आधटराव, पंढरपूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप शिंदे, पंढरपूर शहर कार्याध्यक्ष युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सागर कदम, समाजसेवक शिवाजी धोत्रे , देवानंद इरकल, अभिषेक शहा, सुदीप पवार व पंढरपूर तालुक्यातील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧- lakhansalunkhe75@gmail.com