कर्मयोगी इंस्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश
पंढरपूर प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल यूनिवर्सिटी लोणेरे अंतर्गत आंतर महाविद्यालयीन खो खो या विभागीय क्रीडास्पर्धे मध्ये श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालय शेळवे पंढरपूर येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. विभागस्तरावरील या स्पर्धे मध्ये कर्मयोगी च्या पुरुषगटाने उपविजेतेपद व महिला संघाने सलग तिसर्या वर्षी विजेता होण्याचा मान मिळविला आहे. सदरच्या स्पर्धेचे आयोजन ए जी पाटील महाविद्यालय सोलापूर येथे करण्यात आले होते. आंतर महाविद्यालयीन खो खो स्पर्धेमध्ये कर्मयोगी अभियांत्रिकीच्या महिला संघाने सलग तिसर्या वर्षी विजेतेपद पटकावले आहे. तसेच कर्मयोगीच्या कु.शिवानी बागल या विद्यार्थिनीचा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला. कर्मयोगी मध्ये विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील शिक्षणा बरोबरच शारीरिक शिक्षणाचे ही प्रशिक्षण दिले जाते व त्याचा फायदा विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून घेण्यात येणार्या विविध क्रीडास्पर्धेत मध्ये मिळालेल्या यशातून दिसून येत आहे याचे विद्यार्थी व पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. वरील सर्व क्रीडा स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. गणेश बागल यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, विभागप्रमुख प्रा. डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा. अनिल बाबर, प्रा. सोमनाथ लंबे, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख श्री गणेश बागल तसेच सर्व प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*