सामाजिक

आषाढी यात्रेत भाविकांची गैरसोय टाळून सोयी सुविधा द्या पंढरपूर शहर कॉंग्रेसची निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी.

24 मराठी न्यूज पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर- श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. वर्षातून चार यात्रा भरत असतात. यातील सर्वात मोठी असणारी आषाढी यात्रा जवळ आली असून यानिमित्त पंढरपूर शहरात लाखो भाविक भक्त दर्शनासाठी येतात. आलेल्या भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी भाविकांसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे स्वच्छतागृह व शौचालय ठिकठिकाणी नि:शुल्क उभे करावेत. कायमस्वरूपी सुलभ शौचालय आहेत ते वारंवार वेळ न पाळता बंद असतात त्यावर नियंत्रण आणून ते अधिक वेळ उघडे रहावे याची दक्षता घ्यावी. भाविकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय अनेक ठिकाणी करावी. तसेच साथीचे आजार पसरू नये यासाठी काळजीपूर्वक फवारणी करण्यात यावी. वारकऱ्यांसाठी दिशादर्शक फलक बसविण्यात यावेत, दरवेळी नगरपालिका सोय करतेच पण महिला भगिनींसाठी शौचालयाची फार मोठी अडचण होत असते त्यामुळे त्यांची संख्या वाढवण्यात यावी भाविकांना आवश्यक सोयी सुविधा देण्यात याव्यात अशा विविध मागण्या पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केल्या आहेत. सदरचे निवेदन उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर यांनी स्विकारले.


सदरचे निवेदन देताना युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार, जिल्हा उपाध्यक्ष सुहास भाळवणकर, जिल्हा सरचिटणीस किशोर महाराज जाधव, सेवादल अध्यक्ष गणेश माने, युवकचे विधानसभा अध्यक्ष बलदेव शिकलकर, युवकचे शहराध्यक्ष संदीप शिंदे, सागर कदम मिलिंद अढवळकर, नागनाथ अधटराव, दत्तात्रय बडवे, चंदनशिवे, देवानंद इरकल, अभिषेक शहा, श्रीकांत माने यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यकर्ते उपस्थित होते.

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!