Uncategorized

पंढरीत १८ रिक्षावर पोलिसांची कारवाई.

बेशिस्त रिक्षा चालकावर वाहतूक शाखेची कारवाई

24 मराठी न्यूज पंढरपूर श्री नंदकुमार देशपांडे

पंढरपूर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिक भाविक भक्त यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या भाविकांना शहरातील अस्ताव्यस्त कोठेही रस्त्यात मोकळी जागा दिसेल तिथे येणाऱ्या जाणाऱ्यांना पादचाऱ्यांना अडथळा होईल अशा रिक्षा उभ्या असतात याचा त्रास येणाऱ्या भाविकांना नागरिकांना होत असल्याने चौफाळा परिसर मार्ग शिवाजी चौक अशा ठिकाणी उभ्या असलेल्या अठरा रिक्षावर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई कारवाई केली आहे अलीकडे दिवसेंदिवस रिक्षांचे प्रमाण वाढले असून यामध्ये अधिकृत रिक्षा पेक्षा अनाधिकृत रिक्षाचा भरणा अधिक असल्याने त्याचा त्रास प्रामाणिकपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांनाही काही वेळेला जाणवताना दिसून येत असून वैद्य रिक्षाचालक व अवैध्यक्षाचालक यांच्यामध्ये रिक्षामध्ये पॅसेंजर भरण्यावरूनही अनेक वेळा बाचाबाची चे प्रसंग चौफाळा परिसरात प्रदक्षिणामार्गावर घडले आहेत रिक्षा चालकाने आपला व्यवसाय करण्यास हरकत नाही परंतु आपल्या रिक्षामुळे येणारे जाणारे भाविक नागरीक यांना त्रास होऊ नये याचीही दक्षता रिक्षा चालकांनी घेणे तेवढेच गरजेचे आहे वाहतूक शाखेने केवळ अठरा रिक्षावरच कारवाई करून आपण काहीतरी काम करत आहे हे दाखवण्यापेक्षा अशा बेशिस्त वाहनावर कारवाईचा बडगा उगारावा अशी चर्चा नागरिक व भाविकातून होताना दिसून येत आहे वाहतूक शाखेने बेशिस्त १८ रिक्षा चालकावर कारवाई केल्याने रिक्षा चालकात खळबळ उडाली आहे

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!