शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे शालेय दाखले ऑफलाईन पध्दतीने मिळण्याची व्यवस्था करा – उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे.
24 मराठी न्यूज पंढरपूर/ तालुका प्रतिनिधी
सध्या शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थी विद्यार्धिनींची धावपळ सुरू असून त्या साठी विविध दाखले जवळ आसणे गरजेचे आहे त्या साठी तहसील कार्यालयातुन ऑनलाईन पध्दतीने दाखल्यांचे वितरण केले जात आहे परंतू कित्येकदा सर्व्हर डाऊन आसल्याने दाखले वेळेवर मीळत नाही व दाखले नसल्याने शैक्षणिक प्रवेशासाठी अडचण निर्माण होत आहे, त्यासाठी पुर्वी प्रमाणे ऑफलाईन दाखले देण्याची व्यवस्था झाल्यास वेळेवर शैक्षणिक प्रवेश घेतले जातील व विद्यार्थी विद्यार्थिनींच नुकसान होणार नाही….त्या साठी ऑफलाईन दाखले देण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेने चे उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे यांनी नायब तहसीलदार मा.श्रोत्री साहेब यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. दाखले जर वेळेत मिळाले तर जात निहाय कोठ्यातून विद्यार्थ्यांना एडमिशन घेताना ठराविक रक्कम भरावी लागते परंतु ही कागदपत्रे वेळेत न मिळाल्याने ओपन मधून एडमिशन घ्यावे लागते ज्याची फी सवलती मध्ये आकारणी जात नाही, त्यामुळे वर्ष वाया जाऊ नये म्हणून आकारण पालकांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासांना अकारण सामोरे जावे लागते त्यातच ई सेवा केंद्रे ह्या दाखल्यांसाठी विद्यार्थी आणि पालक वर्गाकडून जास्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत त्याची पण चौकशी करण्यात यावी, काही ठिकाणी या दाखल्यांसाठी दलालपण सक्रिय आहे त्याचा पृशासनाने तत्काळ बंदोबस्त करावा अशी विनंती करण्यात आली
नायब तहसीलदार मा.श्रोत्री साहेब यांनी तत्काळ हे विनंती पत्र मा.जिल्हाधिकारी साहेबांना पाठवून पुढील शासकीय योग्य ती कार्यवाही होईल असे आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शिष्ठमंडळास दिले.यावेळी उपजिल्हा प्रमुख सुधीरभाऊ अभंगराव, शहर प्रमुख रविंद्र मुळे, जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे, महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, शिवसेना उपशहर प्रमुख विनायक वनारे, तानाजी मोरे, युवासेना पंढरपूर तालुका उपयुवाधिकारी प्रणित पवार, युवासेना शहर युवाधिकारी श्रीनिवास उपळकर, युवासेना शहर समन्वयक स्वप्निल गावडे, शिवाजी काळे, अनिल कांबळे, गुरुदेव अष्टेकर, सौरव पवार, चेतन पवार, अजय धोत्रे, अतुल शितोळे तसेच ईतर शिवसैनिक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com