फटाके मुक्त व पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचे मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांचे आवाहन
मोहोळ ( प्रतिनिधी )
स्वच्छ सर्वेक्षण 2024 व माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत मोहोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांनी ‘फटाके मुक्त व पर्यावरण पूरक’ यंदाची दीपावली शहरातील नागरिकांनी साजरी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.* अशा फटाक्यामधून नायट्रेट, नायट्राइट्स, फॉस्फेट आणि सल्फेट या आम्लधमीर्य मूलकांचा ऑक्सीडायझिंग एजन्ट म्हणून उपयोग केला जातो. त्याच्या संयोगातून कार्बन मोनॉक्साइड आणि नायट्रोजन डायॉक्साइड यासारखे विषारी वायू शोभेच्या दारूतून निर्माण होतात व हे वायू मानवी जीवनाला अतिशय घातक असतात. हदयरोग रक्तदाब, अस्थमा, क्रॉनिक ब्राँकायटिस असणाऱ्यांना हे तर जास्त घातक आहेतच, परंतु याबरोबरच गर्भवती स्त्रिया, वृद्ध माणसे, लहान बालके यांना सुद्धा फटाक्यापासून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा जास्त धोका आहे. फटाके वाजवताना सर्वसाधारण निरोगी व्यक्तींनाही अपचन, सर्दी-खोकला, मानसिक अशांती, डोके दुखणे या व्याधी होतात. फटाके लावताना होणारी इजा वा अपघात हा चिंतेचा विषय आहे. फटाक्यांपासून निर्माण होणाऱ्या प्रचंड ध्वनिप्रदूषणामुळे डोकेदुखी, बहिरेपणा आणि मानसिक अशांतता या व्याधी उद्भवतात तर त्याच्या शेकडो पटीने हा त्रास मुक्या जनावरांना आणि पक्ष्यांना होतो. दिवाळी फटाक्यामुळे वायु आणि ध्वनी प्रदूषण होऊ नये त्यासाठी सर्वांनी पर्यावरण पूरक, प्रदूषण मुक्त मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करावी, फटाके मुक्त, प्लास्टिक मुक्त, कचरा मुक्त, प्रदूषण मुक्त व पर्यावरण पूरक ग्रीन फेस्टिवल सण उत्सव साजरे व्हावेत असे शासनाच्या निर्देशानुसार नगरपरिषद कार्यालयाकडून स्थानिक पातळीवर विशेष मोहीम राबवली जात आहे स्थानिक पातळीवर प्लास्टिक बंदी मोहीम सुरू आहे. या सर्व मोहिमेत पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्यासाठी भर द्यावा असेही मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांनी सांगितले.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com