सामाजिक

पुन्हा एकदा भाजपा सरकार” – लोकसभा क्लस्टर हेड मा.आ.प्रशांत परिचारक

पंढरपूर प्रतिनिधी श्री नंदकुमार देशमुख

सांगली येथील लोकसभा कोअर कमिटी बैठक क्लस्टर हेड माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली, यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान, राष्ट्रसेवक मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची सत्ता आणण्यासाठी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता समर्पणाने काम करत असल्याचे परिचारक यांनी सांगितले.या दरम्यान लोकसभा कार्यलय उभारणी, वॉर रूम, संघटनेच्या स्तरावर बूथ समिती, पन्ना प्रमुख, विस्तारक प्रवास, विविध मोर्चा, सेल प्रकोष्ठ यांच्या नेमणुका, तसेच सुपर वरियर तपासणी याची माहिती घेत प्रशांत परिचारक यांनी पक्षाने दिलेले विविध अभियान, गाव चलो अभियन या विषयी आढावा घेतला.मोदी सरकार आणि राज्य सरकार यांनी घेतलेले लोकहिताचे निर्णयाचा प्रसार आणि प्रचार या बाबत देखील उपस्थितां सोबत चर्चा केली. सोबतच पक्ष संघटना, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांच्यातील समन्वय व मतदार संघाची एकूण राजकिय सामजिक परिस्थितीची माहिती घेतली.याप्रसंगी कामगार मंत्री तथा पालकमंत्री नाम.सुरेश (भाऊ) खाडे, कल्स्टर प्रमुख आमदार प्रशांत परिचारक, सह कल्स्टर सहप्रमुख आमदार राम सातपुते यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक विधानसभा निहाय संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यात आला.यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, सांगली लोकसभा निवडणूक प्रमुख दिपक शिंदे, माजी आमदार दिनकर पाटील, विलासराव जगताप, प्रदेश सदस्या निता केळकर, हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख सत्यजीत देशमुख, शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राट महाडीक, जत विधानसभा निवडणूक प्रमुख रवि तम्मनगौंडा पाटील, पै.पृथ्वीराज पवार, मोहन वणखंडे, डॉ.सरीता कोरबु, डॉ.उषाताई दशवंत, ब्रम्हानंद पडळकर, मिलींद कोरे, विलास काळेबाग बाबासाहेब पाटील उपस्थित होते.

*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!