सामाजिक

मंगळवेढा येथील पाच तिर्थक्षेत्रांना दहा कोटीचा निधी मंजूर :- आमदर आवताडे

मंगळवेढा प्रतिनिधी

ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस देवदर्शना साठी भाविक,यात्रेकरुंची संख्या मोठ्या प्रमाणांत सातत्याने वाढत आहे. अशा ठिकाणी भाविक यात्रेकरु यांना विविध सोयी-सुविधा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नामुळे पुरविणे शक्य होत नाही. म्हणून शासनाने ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास योजना राबवली असून सध्या शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना अमलात आणली आहे. सरकारने ब वर्गात असलेल्या देवस्थानांना दोन कोटी ऐवजी पाच कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील श्री क्षेत्र आरळी येथील नरसिंह देवस्थानसाठी पहिल्यांदाच चार कोटी 59 लाख रुपये निधी उपलब्ध झाला असून या निधीतून देवस्थानच्या भौतिक विकासाची कामे करण्यात येणार आहेत अशी माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिलीमंगळवेढा तालुक्यातील आरळी,मुंढेवाडी,शिरनांदगी,हुलजंती, बोराळे असणाऱ्या तीर्थक्षेत्रांना दहा कोटी दोन लाख रुपये निधी मंजूर केला असून यामधून या गावातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येणार आहे मी आमदार झाल्यानंतर अरळी या देवस्थानचा तीर्थक्षेत्र ब वर्गात समावेश करून ४ कोटी ५९ लाख रुपये निधी मंजूर केला आहे या निधीमधून १ कोटी ७३ लाखाचे पुरुष भक्त निवास बांधणे १ कोटीचे महिला भक्त निवास बांधणे २६ कोटी रुपयांचे पुरुष व महिला स्वतंत्र स्वच्छतागृह बांधणे ५२ लाख रुपयांचा रस्ता करणे ५० लाख रुपये संरक्षक भिंत बांधणे व ३० लाख रुपये पाणीपुरवठा सोयी सुविधा करणे असा खर्च अरळी येथील नरसिंह देवस्थान साठी करण्यात येणार आहे त्याचबरोबर मुंढेवाडी व शिरनांदगी या देवस्थानांचा ब वर्गात समावेश असूनही अद्याप निधी मिळाला नव्हता त्या देवस्थानांनाही ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यांनी मुंढेवाडी साठी दोन कोटी व शिरनांदगीसाठी दोन कोटी रुपये मंजूर करून दिले आहेत.तसेच हुलजंती देवस्थानसाठी १ कोटी ७ लाख रुपये व बोराळे देवस्थानला ३६ लाख रुपये मंजूर झाले असून या देवस्थानची कामेही लवकरच सुरू करण्यात येणार आहेत तालुक्यातील अनेक देवस्थानाना दिवसेंदिवस भक्तांची गर्दी वाढत असून त्या देवस्थानचा विकास करण्यासाठी निधीची आवश्यकता असते या देवस्थानचा विकास करण्यासाठी शासन स्तरावर निधीसाठी पाठपुरावा सुरू असून क वर्ग, ब वर्ग, अ वर्गात असणाऱ्या देवस्थानांना निधी मिळवून जास्तीत जास्त निधी मतदार संघात आणण्याचा माझा प्रयत्न असणार आहे असे आमदार समाधान आवताडे यांनी बोलताना सांगितले. तीर्थक्षेत्रांना दहा कोटी निधी मंजूर केल्याबद्दल आ. अवताडे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा सत्कार करून अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!