सामाजिक

ड्रोनच्या सहाय्याने शेती फवारणी करणे सोईचे चेअरमन – कल्याणराव काळे

भाळवणी :- प्रतिनिधी

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे वतीने आधुनिक पध्दतीने ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करुन ऊस पिकावर फवारणी करणेचे प्रात्यक्षिक कारखान्याचे कार्यक्षेत्रात पिराची कुरोली येथे कारखान्याचे माजी संचालक व प्रगतशिल बागायतदार पांडुरंग रामचंद्र कौलगे यांचे शेतातील ऊस पिकावर एअर बोट एरोस्पेस प्रा.लि. व महाराष्ट्र राज्य् सहकारी साखर संघ यांच्या सहयोगाने ऊस पिकावर फवारणी प्रात्यक्षिक घेण्यात आले या संदर्भात मौजे पिराची कुरोली व भागातील ऊस बागायतदार यांच्या समवेत प्रात्यक्षिक झाले. या भागातील शेतकऱ्यांना ड्रोनची माहिती कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी ड्रोनव्दारे फवारणी केल्यास वेळेची बचत, औषधाचा परिणाम व किफायतशीर औषधाचा वापर असे विविध फायदे होणार आहेत. तसेच ऊस बागायतदार यांनी सदर ड्रोन खरेदी केल्यास महाराष्ट्र शासनाचे वतीने 50 टक्के सबसिडी देण्यात येणार आहे. जर संस्थेने ड्रोन खरेदी केल्यास त्यांना 40 टक्के सबसिडी देण्यात येणार आहे. अशी माहिती देण्यात आली. एअर बोट एरोस्पेस कंपनीचे अधिकारी प्रथमेश यांनी फवारणी संदर्भात प्रात्यक्षिक दाखवुन माहिती दिली व भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संबोधित केले. याप्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर, ऊस तोडणी वाहतुकीचे चेअरमन मोहन नागटिळक, संचालक सर्वश्री परमेश्वर लामकाने, अमोल माने, अरुण नलवडे, सुरेश देठे, माजी संचालक पांडुरंग कौलगे, इब्राहिम मुजावर, राजाराम माने, कंपनीचे अधिकारी तसेच भागातील ऊस बागायतदार व कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक पोपटराव घोगरे, शेती अधिकारी प्रतापराव थोरात, ऊस पुरवठा अधिकारी हरि गिड्डे व कारखान्याचा सर्व शेती स्टाफ उपस्थित होता.

*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!