स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी फडकाविला कर्नाटकात झेंडा
बिदरमधील राष्ट्रीय दर्जाच्या परिषदेमध्ये ११ विद्यार्थ्यांना पारितोषिके
पंढरपूर–प्रतिनिधी
गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील ‘स्वेरी’ ही संस्था उत्तम शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याच्या दृष्टीने त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे सातत्याने लक्ष देत असते. तंत्रशिक्षणाच्या अभ्यासासंबंधी इंडस्ट्रीयल व्हिजीट असो अथवा राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय दर्जाच्या परिषदा असो, यासाठी स्वेरीकडून राज्य व देशाबाहेर जाण्यासाठी विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापकांना विशेष सवलती दिल्या जातात. याचा फायदा प्राध्यापक व विद्यार्थी नियमित घेत आहेत हे दिसून येत आहे. अशा होतकरू विद्यार्थ्यांसाठी अनेक हितावह असे धाडसी निर्णय ‘स्वेरी’ घेत असल्यामुळे अल्पावधीतच स्वेरीने शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक विश्वात तर ‘स्वेरी’चे नाव आहेच पण आता स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकात जावून आपल्या स्वेरीच्या शिक्षण संस्कृतीची मोहोर तेथे उमटवली, याचे सर्वत्र कौतुक होत आहे बिदर (कर्नाटक) मधील गुरुनानक देव इंजिनिअरींग कॉलेजमध्ये दि. २७ व दि.२८ सप्टेंबर, २०२४ रोजी ‘संस्टेनेबल इन्फ्रास्ट्रक्चर अँड इनोव्हेशन इन सिव्हील इंजिनिअरींग’ या विषयावर आयोजिलेल्या राष्ट्रीय दर्जाच्या परिषदेमध्ये ‘शोध प्रकल्प’ स्पर्धेमध्ये स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या तब्बल ११ विद्यार्थ्यांनी बक्षिसे मिळविली. त्यामुळे राज्याबरोबरच आता राज्याबाहेर देखील स्वेरी चा झेंडा डौलाने फडकविला गेला आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हील इंजिनिअरींग विभागातील डॉ. माणिक देशमुख व प्रा. चेतन लिमकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले. सदरच्या राष्ट्रीय दर्जाच्या परिषदेमध्ये स्वेरीच्या एकूण ४५ विद्यार्थ्यांनी १६ शोध पेपर सादर केले. त्यातून सायली विजय अस्टुळ, नम्रता दिनकर चवरे, आकांक्षा जगन्नाथ माने व प्रियांका प्रताप कारंडे यांनी ‘परफॉर्म्स इव्ह्याल्युएशन ऑफ मॉर्टर मिक्सेस’ या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. अस्मिता हनुमंत मोरे, श्वेता रवी कोकणे, पूजा संतोष ढेरे व स्मिता धनाजी देशमुख यांनी डेव्हलपमेंट ऑफ पर्विअस कॉन्क्रेट पेवर ब्लॉक्स फॉर बिल्डींग’ या स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक मिळविला तसेच महेश लक्ष्मण पडवळे, यश सतीश निंबाळकर व संकेत चंद्रकांत लेंडवे यांनी ‘प्रिसिजन एलिव्हेशन मॅपिंग थ्रू ड्रोन इंटीग्रेशन’ यामध्ये तृतीय क्रमांक पटकाविला. चुरशीच्या पेपर स्पर्धेत स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारल्यामुळे गुरुनानक देव इंजिनिअरींग कॉलेज संस्थेचे चेअरमन सरदार बलबीर सिंग, संस्थेच्या व्हाईस चेअरपर्सन श्रीमती रेश्मा कौर व तेथील प्राचार्य डॉ. सुरेश रेड्डी, उपप्राचार्य डॉ. एम. धनंजय, अधिष्ठाता डॉ. सिंधु प्रसाद, विभागप्रमुख प्रा. उमाशंकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देवून गौरविण्यात आले. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, संस्थेचे इतर विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम. पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विभागप्रमुख डॉ. सोनाली पाटील, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर तीनही महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी पेपर प्रेझेन्टेशन मध्ये यश मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले
बिदर मधील गुरुनानक देव इंजिनिअरींग कॉलेजमध्ये झालेल्या ‘पेपर परिषदेमध्ये’मध्ये पारितोषक स्वीकारताना स्वेरीच्या विद्यार्थीनी डावीकडून अस्मिता हनुमंत मोरे, श्वेता रवी कोकणे, पूजा संतोष ढेरे, स्मिता धनाजी देशमुख व तेथील विभागप्रमुख प्रा. उमाशंकर.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com