"This news portal adheres to the Digital Media Ethics Code, 2021, established under the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, notified by the Ministry of Information and Broadcasting (MIB). Furthermore, it ensures compliance by submitting mandatory monthly reports to the government as stipulated.

सामाजिक

राष्ट्रवादीच्या जनसन्मान मेळाव्यात कार्यकर्त्यांची मोफत आरोग्य तपासणी अनेकांनी घेतला सेवेचा लाभ… !

*मोहोळ तालुका प्रतिनिधी

बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान मेळाव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा सुमारे ३०० पेक्षा अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लाभ घेत मोफत औषध वाटपही करण्यात आले. राज्याचे  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,  प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला  प्रदेशाध्यक्षा रूपाली  चाकणकर यांच्या नेतृत्वखाली राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष आणि निरामय कॅन्सर हॉस्पिटल, केडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबाराचे  आयोजित करण्यात आले. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सातव यांनी या शिबिराचे योग्य नियोजन केले होते पक्षाच्या जनसन्मान मेळाव्याला उपस्थित राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर, लतीफभाई तांबोळी,  माजी सैनिक सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक राजेशिर्के आदींसह पोलीस अधिकारी, तसेच पत्रकार बांधवांनी शिबिराला भेट दिली. यावेळी प्रथमोपचार पेटी देऊन वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सातव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य विस्तारक सचिन सरवदे, सुनिल गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रीती घाडगे, पुणे जिल्हाध्यक्ष निनाद टेमगिरे, हवेली तालुका अध्यक्ष विनोद शिंदे, निरामय हॉस्पिटलचे डॉ.  विशाल खळतकर, वैद्यकीय सहाय्यक अभिजीत पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी व आदी मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय सहाय्यक नीलम पाटील, लक्ष्मण सुरवसे, केदार केळकर यांनी शिबिरासाठी परीश्रम घेतले तर विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या शिबिरात तपासणी करुन औषधे घेतली. *चौकट : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष राज्यामध्ये अतिशय प्रभावीपणे काम करीत असून जास्तीत जास्त रुग्णांनी या मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून सेवेचा लाभ घ्यावा… सचिन सरवदे राज्य विस्तारक वैद्यकीय मदत कक्ष

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!