सामाजिक

श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कर्तबगार चेअरमन मा. श्री. अभिजीत पाटील यांना वाढदिवसा निमित्त मा. अभिजीत (आबा) पाटील मित्र परिवार कडून शुभेच्छांचा वर्षाव.

पंढरपूर प्रतिनिधी

अभिजीत पाटील यांच्या सोबत त्यांचे 170 मित्र परिवार यांनी एकत्रितपणे डीव्हीपी उद्योग समूहाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. चार जिल्ह्यातील चार साखर कारखाने घेवून धाराशिव साखर कारखाना युनिट 1, 2 ,3 व 4 हे अल्पावधित नावारूपास आलेले श्री. अभिजीत पाटील यांची दुरदृष्टी व खंबीर मित्रांची साथ संस्थेवर असलेले प्रेम आणि कामाप्रती असलेली कर्तव्यनिष्ठा यातून हा उद्योग दरवर्षी प्रगती करत आहे. कामातील प्रामाणिकपणा यामुळेच चार साखर कारखाने प्रगतीपथावर आहेत. ऊस वाहतूक ठे केदार ते चार साखर कारखान्यांचा चेअरमन असा त्यांचा थक्क करणारा प्रवास सुरु आहे.ऑक्सिजन निर्मितीतून वाचविले शेकडो जीव…संपूर्णदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला, लोक जीवानीशी जावू लागले, त्यावेळी देशाचे नेते शरद पवार साहेब यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु करावे असे आवाहन के ले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत त्यावेळी अभिजीत पाटील यांनी स्वतःच्या साखर कारखान्यांत ऑक्सिजन निर्मितीचे शिवधनुष्य उचलले. साखर कारखान्यामध्ये ऑक्सिजन निर्मिती खरेतर हे धाडसाचे पाऊल होते. या प्रकल्पाला पूर्ण करण्यास कमीतकमी तीन महिने तरी लागतील असे जाणकारांचे मत होते. मात्र, हा प्रकल्प १५ दिवसांत पूर्ण करण्याचा ध्यास श्री. अभिजीत आबा पाटील यांनी घेतला. त्यासाठी तोटा सहन करून इथेनॉल प्रकल्प बंद ठेवला. दिवसाचे चोवीस तास अविरतपणे काम करून सुरू असलेल्या प्रकल्पामध्ये तांत्रिक बदल करून फक्त काही मोजकेच पार्टस परदेशातून मागवून संपूर्ण भारतीय बनावटीचा राज्यातील नव्हे तर संपूर्णदेशातील साखर कारखान्यातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प अवघ्या १५ दिवसांमध्ये चालू के ला. या ऑक्सिजन प्रकल्पाचे उदघाटन करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे साहेब, देशाचे कें द्रीय रस्ते व वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार साहेब, जलसंपदामंत्री श्री. जयंत पाटील साहेब, आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे साहेब, उस्मानाबादचे पालक मंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निबांळकर, आमदार कै लास घाडगे पाटील व इतर मान्यवरांनी कारखान्याचे अध्यक्ष श्री. अभिजीत आबा पाटील यांच्या धाडसाचे कौतुक केले.

हा प्रकल्प संपूर्णदेशासाठी मार्गदर्शक ठरेल असे गौरवोद्गार काढले. हा ऑक्सिजन प्रकल्प देशासाठी दिलासादायक व इतर कारखान्यांसाठी दिशा दर्शक ठरला आहे. ग्रामीण भागातील सर्व सामान्य कु टुंबातील तरुण अभिजीत पाटील सारखे मोठे उद्योजक, सामाजिक, राजकिय विविध क्षेत्रात मोठे योगदान देऊ शकतो. त्यासाठी तरुणांनी अभिजीत पाटील यांचे सारखे मोठी स्वप्ने पाहून आपली ध्ये निश्चित करुन जिद्दीने धाडसाने चिकाटीने आपल्या स्वतः बरोबर आपण या देशाचे मातीचे काही तरी देणे लागतो. म्हणून आपण आपल्या राष्ट्राला, आपल्या राज्याला, आपल्या जिल्ह्याला व आपल्या तालुक्याला गावाला समृद्ध करण्यासाठी आपल्या सोबत अभिजीत पाटील यांच्या प्रमाणे निर्व्यसनी मित्रांचा समूह उभा करत आपल्या राष्ट्राच्या प्रगती होत मध्ये प्रत्येक तरुणांनी सहभाग नोंदवावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!