वृक्षतोडी थांबवा अन्यथा वन विभाग कार्यालय समोर आंदोलन करणार ! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू मुळीक आक्रम
माण तालुक्यासारख्या दुष्काळी भागात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असून दहिवडी कार्यक्षेत्रात येणाऱ्या अनेक गावात बेसुमार वृक्षतोड सुरू असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू मुळीक यांनी वन विभागाच्या निदर्शनास आणून दिले आहे. या वृक्षतोडी मुळे भविष्यात माण तालुक्यातील शेतकऱ्यांना गंभीर संकटाला सामोरे जावे लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले. याबाबतचे पत्र त्यांनी दहिवडी वनपरिक्षेत्राचे अधिकारी अमित मुळीक यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, माण तालुक्यात आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या भागात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. या वृक्षतोडीमुळे भविष्यात तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना गंभीर संकटांना सामोरे जावे लागेल. वृक्षतोडीचा परिणाम हा थेट शेतकरी वर्गावर व पावसावर होत असतो. भविष्यात होणारे गंभीर परिणाम ओळखून आपण बेसुमार सुरू असलेल्या वृक्षतोडीवर लगाम घालने गरजेचे आहे. तसेच गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे प्रतिवृक्षाला पन्नास हजार रुपये प्रमाणे दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याप्रमाणे संबंधितावर कारवाई करावी. विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्या नागरिकावर कडक कारवाई करावी व अनधिकृत वृक्षतोड बंद करावी अन्यथा तालुक्यात कोणते ठिकाणी सुरू असलेली वृक्षतोड निदर्शनास आल्यास कोणतेही क्षणी आपल्या कार्यालयासमोर येऊन आंदोलन करणार आहोत असा सज्जड इशारा त्याने दिला आहे.