चौफाळा येथील गोपाळ कृष्ण मंदिरात कृष्णाष्टमीचा सोहळा संपन्न
पंढरपूर नंदकुमार देशपांडे
पंढरी नगरीत कृष्णाष्टमीच्या जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न होत असून असाच सोहळा पंढरपुरातील प्रसिद्ध अशा चौफळा येथील श्रीकृष्ण मंदिरात भल्या पहाटे संपन्न झाला. सुमारे पाहुणे आमचे वर्षापूर्वीची पुरातन अशी श्रीकृष्णाची मूर्ती असून देऊळही पुरातन असून ते बडवे यांच्या मालकीचे आहे या कृष्ण मंदिरात बडवे कुटुंब तसेच परिसरात बसणारे फुलमाळी विक्रेते यांच्यासह सर्वजण कृष्णाष्टमीच्या सोहळ्याकरता सहभागी होतात मंदिरावर विद्युत रोषणाई तसेच फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आलेली आहे पहाटे श्रीकृष्णास पियुष बडवे सागर बडवे पप्पू बडवे सुभाष बडवे व त्यांच्या परिवाराच्या वतीने पंचामृत्यु कसा महा अभिषेक श्री गोपाळ कृष्ण करण्यात आला त्याचवेळी इतरही भाविकांनी श्रीकृष्ण पंचामृताचा अभिषेक केला या अभिषेकानंतर श्रीकृष्णाच्या दर्शनाकरता देऊळ खुले करण्यात आले पहाटे पाच वाजल्यापासूनच कृष्ण भक्त आणि दर्शनासाठी व कृष्णाष्टमीच्या सोहळ्यासाठी रांग लागली होती संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. श्री गोपाळकृष्ण महा अभिषेक झाल्यानंतर विविध भक्ताने तसेच बडवे कुटुंबाच्या वतीने प्रसाद म्हणून आलेल्या भक्तांना केळी शेंगदाण्याचे लाडू उपासाचे पदार्थ वाटप करण्यात आले यानंतर दुपारी श्रीकृष्णास नैवेद्य दाखवण्यात आला. नेहमीच्या प्रथेप्रमाणे गोपाळ कृष्ण मंदिरात दुपारी महिलांचा भजनी मंडळाचा कार्यक्रम सायंकाळी भजनी मंडळाचा कार्यक्रम तसेच इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तसेच सायंकाळी भजन व आरती झाल्यानंतर रात्री बाराच्या सुमारास कृष्णाच्या जन्माष्टमीच्या सोहळ्यानिमित्त कृष्ण मंदिराच्या आतील भागात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम संपन्न केला जात आहे अशाप्रकारे मोठ्या भक्ती भावाने गोपाळ कृष्ण मंदिर चोपडा येथील श्रीकृष्ण मंदिरात गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या धार्मिक व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला दिवसभर श्रीकृष्ण भक्तांनी श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन प्रसाद ही भक्षण केला त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय होऊन गेला होता