सुधाकरपंतांच्या संस्कारातूनच लोकांना दृष्टी देण्याचं काम : प्रशांत परिचारक
पंढरपूर प्रतिनिधी – श्री नंदकुमार देशपांडे
पंढरपुरातील 780 रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्नकर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यतिथीनिमित्त नेत्र तपासणी शिबिरामध्ये 3200 रुग्णांचा सहभाग सर्वसामान्य लोकांना मदत झाली पाहिजे. लोकांचे संसार उभे राहिले पाहिजेत. हा स्वर्गीय सुधाकरपंत अर्थात मोठ्या माणसांचा संस्कार नेत्र शिबिराच्या माध्यमातून जपला जातोय. या शिबिरातून यंदा ७८० शस्त्रक्रिया होत आहेत. त्यामुळे सामान्यांच्या मदतीचे समाजकारण करत, लोकांना दृष्टी देण्याचे काम होत आहे. असे प्रतिपादन आमदार प्रशांत परिचारक यांनी केले.कर्मवीर सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यतिथी निमित्त पंढरपूर तालुक्यातील 3200 इतक्या रुग्णांची नेत्र तपासणी तर सुमारे 780 रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया संपन्न झाली
या शिबिराचा समारोप नुकताच कासेगाव येथे संपन्न झाला. प्रणव परिचारक आणि पांडुरंग परिवार युवक आघाडी यांच्या माध्यमातून तालुक्यात नऊ ठिकाणी शिबिर झाले.पांडुरंग परिवार युवक आघाडी आणि प्रणव परिचारक यांच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटांमध्ये नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शास्त्रक्रीया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि करकम येथील ग्रामीण रुग्णालय अशा नऊ ठिकाणी हे शिबिर संपन्न झाले. पुण्यातील एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय यांच्या सहकार्यातून आणि पांडुरंग परिवाराच्या पुढाकारात ग्रामीण भागातील नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप नुकताच कासेगाव येथे झाला.पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून दृष्टी अभियान हे सुरू करण्यात आले आहे. पंढरपूर तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प प्रणव परिचारक यांनी केला आहे. या माध्यमातूनच या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये आत्तापर्यंत 12,300 रुग्णांची तपासणी गेल्या चार वर्षात झाली. तर 4 हजार 700 रुग्णांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर हे करण्यात आले आहे. यंदाही या शिबिरांमध्ये तब्बल 3200 रुग्णांची तपासणी झाली . तर 780 गुणांची पुणे येथे शस्त्रक्रिया संपन्न झाली आहे. यामध्ये डोळ्यातील मास वाढलेल्या 56 रुग्णांची वेगळी आणि यशस्वी शस्त्रक्रिया या शिबिराच्या माध्यमातून संपन्न झाली.आमदार प्रशांतराव परिचारक, उमेशराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणव परिचारक यांच्या माध्यमातून पांडुरंग परिवाराच्या वतीने या शिबिरांचे आयोजन होते आहे. पंढरपूर तालुक्यातील शंभरहून अधिक गावातील रुग्णांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदवला. सलग चार वर्षे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रणव परिचारक घेत असलेले नेत्र शिबिर ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदायिनी ठरत आहे.