6 सप्टेंबर ग्राहक चळवळीच्या कार्याचा स्थापना दिन
संघटना सुवर्ण महोत्सवी वर्ष संपन्न करीत आहे या निमित्ताने घेतलेला हा आढावा
पंढरपूर प्रतिनिधी
समाजोत्थानासाठी दिवस-रात्र ध्येय वेडेपणाने देश स्तरावर कार्य करू शकतो याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे बिंदुमाधव जोशी भारताच्या समग्र ग्राहक चळवळीचा इतिहास म्हणजे जणू नानांच्या जीवनपटच म्हणावा लागेल. संपूर्ण देश हेच कार्यक्षेत्र मानून ते ग्राहक चळवळी साठी संपूर्ण देशभर प्रवास करीत राहिले. त्यातूनच जम्मू पासून ते केरळ पर्यंत त्यांनी सुरू केलेल्या ग्राहक पंचायतीच्या स्वयंसेवा संघटनेचे कार्य संपूर्ण जिल्ह्या जिल्ह्यातून प्रभावीपणे सुरू आहे. प्रबोधनात्मक व्याख्याने, चर्चासत्रे, स्तंभलेखन, ज्ञानीयांच्या गाठीभेटी, मेळावे, बैठका,शिबिरे अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण आयुष्यभर ते व्यस्त राहिले.1972 ला आलेल्या दुष्काळात ग्राहकांची प्रचंड लुबाडणूक होऊ लागली होती ती नानांना पाहवत नसायची आणि त्यातूनच *ग्राहक चळवळीचा* जन्म झाला. *6 सप्टेंबर 1974 रोजी पुण्यात “युवक महामंडळ जनता ग्राहक चळवळ ” या नावाने भारताच्या ग्राहक चळवळीची लोकयात्रा* खऱ्या अर्थाने सुरू झाली. आणि विशेष म्हणजे *23 फेब्रुवारी 1975 या दिवशी न्यायमूर्ती महंमद करीम छागला यांच्या हस्ते, पुणे विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू देवदत्त दाभोळकर यांच्या अध्यक्षतेखाली* *पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात या “युवक महामंडळ जनता ग्राहक चळवळीचा ” “ग्राहक पंचायत “अशा नामकरणाचा आणि “गरुड मानचिन्हाचा” लोकार्पण सोहळा संपन्न झाला.* *ग्राहकांनी ग्राहकांच्या राष्ट्रोत्थानासाठी उभारलेली ही एक लोक चळवळ खऱ्या अर्थाने अर्थक्षेत्राच्या शुद्धीकरणाचा प्रकल्पच म्हणावा लागेल.* असंख्य ग्राहकांची चेतना जागृत करून प्रशिक्षित आणि संघटित केली. अफाट जिद्द आणि अखंड परिश्रमातून *”अखिल भारतीय ग्राहक पंचायत “* नावाची ग्राहकांच्या सहभागातील पहिली देशव्यापी संघटना उभी केली. एवढेच करून ते थांबले नाहीत तर सामान्य माणसाला सहजपणे न्याय मिळावा म्हणून *”1986 साली ग्राहक संरक्षण कायदा “* आणि त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. *तत्वज्ञान, संघटना आणि प्रत्यक्ष कार्यवाही या त्रिसूत्रीचे रचनात्मक काम* त्यांच्या हातून उभे राहिले. अडवणूक झालेल्या सामान्यां साठी त्यांचे प्रश्न सोडवणारी नवीन कार्यशैली त्यांनी जन्मास घातली. प्रश्न सोडवणारे अनेक दलालांची दुकाने त्यांनी बंद करून *आपले प्रश्न आपण सोडवू शकतो हा आत्मविश्वास खेड्यापाड्या तील ग्राहकांच्या त्यांनी निर्माण केला* चर्चा, संवाद आणि समन्वय या यंत्रणेवर विश्वास ठेवून प्रजा आणि प्रशासन यांना एकत्रितपणे बांधले. या देशात अनेक घटकांच्या संघटना यापूर्वीही उभारल्या गेल्या आहेत परंतु *ग्राहकांची संघटना उभारण्याचा नवोन्मेषाचा कार्य हाती घेऊन ते सत्यात उतरविले.* आणि भारतातील ग्राहकाला एक वेगळी प्रतिष्ठा आणि आत्मवलय प्राप्त झाले. *आज ग्राहक चळवळीला समाज मान्यता, राजमान्यता आणि न्याय मान्यता देखील मिळाली आहे* .अशी सर्वकष मान्यता मिळविण्यासाठी अतिशय विचारपूर्वक समाज जागरणाची व्यूहरचना करून टप्प्याटप्प्याने यश प्राप्त होण्यामागे निस्पृह, अहंकार शून्य, लोकेषणा आणि वित्तेषणा यापासून दूर राहिलेल्या *बिंदुमाधव जोशी या ध्येयवेड्या माणसाचे अथक परिश्रम कारणीभूत आहेत.*शब्दांकन आणि प्रसारक : *संदीप शिवाजी जंगम* *प्रांत सचिव* अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मध्य महाराष्ट्र प्रांत70837320209922314520 संकलन. नंदकुमार देशपांडे अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका उपाध्यक्ष व पत्रकार