आनंदाचा शिधा गोदामात, शिधापत्रिका धारक स्वस्त धान्य दुकानदाराच्या दारात
पंढरपूर प्रतिनिधी – नंदकुमार देशपांडे
मागील वर्षी प्रमाणे यावर्षीच्या गौरी गणपती सणाला आनंदाचा शिधा शिधापत्रिका धारकांना घेण्यात येणार अशी घोषणा काही दिवसापूर्वी करण्यात आली होती परंतु त्याचा विचार मात्र शासन प्रशासन आणि पुरवठा अधिकारी यांना पडलेला दिसून आला गौरी गणपतीचा सण होऊन आठ दिवस उलटून गेले तरीही अद्याप स्वस्त धान्य दुकानातून आनंदाचा शिधाचे किट आले नसल्याचे समजले असून ते गोदामातच पडून आहे त्यामुळे आनंदाचा शिधा गोदामाल शिधापत्रिकाधारक रेशन दुकानदाराचे दारात असे चित्र सर्वत्र पाहण्यास मिळत आहे. वास्तविक शासनाने प्रशासनाने घोषणा केल्याप्रमाणे आनंदाचा शिधा हा गौरी गणपती सनापूर्वी शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य दुकानातून वितरित केला जाईल अशी घोषणा करण्यात आली होती परंतु पुरवठा ठेकेदाराचा नियोजन शून्य तर प्रशासनाचा पुरवठा विभागाचा समन्वयाचा अभाव यामुळे गौरी गणपतीच्या सणाच्या काळात शिधापत्रिका धारकांना सुद्धा मिळालाच नाही. शासनाने लाडकी बहीण या योजने द्वारे प्रत्येक बहिणीला पंधराशे रुपये दिले परंतु पोटापाण्यासाठी लागणारा लागणारा सिद्धा मात्र स्वस्त धान्य दुकानातून पुरवठा करण्यास असमर्थ ठरले असेच म्हणावे लागेल सध्या खुल्या बाजारात जीवनावश्यक वस्तूचे डाळी तांदूळ भाऊ यांचे भाऊ वाढले असून त्यामुळे खुल्या बाजारातून जीवनावश्यक वस्तू घेताना महिलांना तारेवरची कसरत करावी लागतात दिसून येते. प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा देण्याचे ठरले असताना प्रशासकीय शासन पातळीवर पुरवठा विभागाने याचे नियोजन करणे गरजेचे असताना मात्र नियोजनाचा अभाव असल्यामुळेच आनंदाचा शिधा हा किट च्या माध्यमातून गोदामातच पडून आहे मागील वर्षे गौरी गणपतीच्या सणाला शंभर रुपयांमध्ये चणाडाळ तेल साखर रवा आधी पाच वस्तू स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिका धारकाला वितरित करण्यात आल्या होत्या त्याच धर्तीवर गौरी गणपती सणाला यावेळीही आनंदाचा शिधा स्वस्त धान्य दुकानातून वाटप करण्याचे ठरवले गेले परंतु अद्याप स्वस्त धान्य दुकानातून आनंदाच्या शिधा याच्या किटचा पत्ताच नाही. शिधापत्रिका धारक रेशन दुकानदारा याचे दारात हेलपाटे घालून आनंदाचा शिधा आला का याची विचारणा करत आहेत सणासुदीच्या काळात आनंदाचा शिधा स्वस्त धान्य दुकानातून न आल्याने शिधापत्रिका धारक व दुकानदार यांच्यामध्ये काही वेळा शाब्दिक चकमकी झाल्याचे आढळून आले. गौरी गणपतीच्या सणाची काळात आनंदाचा शिधा स्वस्त धान्य दुकानातून न मिळाल्याने शिधापत्रिकाधारकातून नाराज दिसून येत आहे. शासनाने पुरवठा विभागाने अन्न नागरी पुरवठा विभागाने पुढील सणासाठी आनंदाचा शिधा वाटप करण्याचे ठरल्यास त्याचे युद्ध पातळीवर नियोजन करणे आगत्याची आहे मागील काही वेळेस सन संपल्यानंतर आनंदाचा शिधा दुकानातून शिधापत्रिका धारकांना वाटप करण्यात आला यावेळी स्वस्त धान्य दुकानातून रवा चणाडाळ आली तर तेलाचा पत्ता नव्हता काही किट हे अपुरे होते असे न होता पुढील सणात आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार असेल तर शिधापत्रिकाधारकांना सनापूर्वी किमान आठ दिवस अगोदर ज्या वस्तू शंभर रुपयांमध्ये देण्यात येणार आहेत त्याचे नियोजन काटेकोरपणे होणे गरजेचे आहे