मोहोळ नगरपरिषद पथविक्रेता समिती निवडणूक बिनविरोध
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. योगेश डोके यांचे हस्ते प्रमाणपत्र वितरण
मोहोळ ( प्रतिनिधी ):
मोहोळ नगरपरिषद पथ विक्रेता सदस्य पदाची निवडणुक बिनविरोध पार पडली विजयी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रशासक डॉ. योगेश डोके यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.* यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुवर्णा हाके, कर निर्धारण व प्रशासन अधिकारी रणजित कांबळे, वरीष्ठ लिपीक दिनेश गायकवाड, अभियंता अमित लोमटे, कर निरीक्षक प्रियंका चव्हाण उपस्थित होते. आठ पैकी एक जागा निरंक तर सात सदस्य बिनविरोध निवडून आल्याची माहिती नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रशासक डॉ. योगेश डोके यांनी देत घोषीत केले. शैनाज खालीद शेख (अल्प संख्यांक महिला ), प्रिती राजेंद्र घाडगे ( अनुसूचित जाती), शेखलाल इसाईल तांबोळी ( इ. मा. व ), विष्णू सुखदेव शिंगाडे (दिव्यांग ), फारुख ईकबाल बागवान ( सर्वसाधारण ), रहिम अ. रहिम हुंडेकरी ( सर्व साधारण ), संगीता मानाजी चवरे ( सर्वसाधारण महिला ), हे उमेदवार बिनविरोध निवडून आले. बिनविरोध निवडून आलेल्या नवनिर्वाचन सदस्यांनी प्रशासनांस योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. योगेश डोके यांनी केले व शुभेच्छा दिल्या. या निवडणूक प्रक्रियेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुवर्णा हाके, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रणजित कांबळे, वरीष्ठ लिपीक दिनेश गायकवाड यांनी काम पाहिले.