24 मराठी न्यूज मुख्य संपादक श्रीलखन साळुंखे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल मध्ये तंबाखू मुक्त शाळा अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दंत शल्यचिकित्सक उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर डॉ. प्रसन्न भातलवंडे उपस्थित होते.डॉ.प्रसन्न भातलवंडे यांचा सत्कार स्कूलच्या प्राचार्या डॉ. जयश्री भोसले यांच्या हस्ते आला.तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय स्कूलचे व्हॉइस प्रिंसिपलआणि अकॅडेमिक कोऑर्डिनेटर विजय तुरेवाले यांनी करून दिला.या कार्यक्रमाचे औचित्य साधून तंबाखू मुक्त शाळा अभियानांतर्गत दिनांक १५मार्च २०२२ रोजी इयत्ता ५वी ते ८वी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला व रांगोळी स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांचे डॉ.भातलवंडे यांच्या हस्ते प्रशिस्त पत्रक व सन्मानचिन्ह देण्यात आले.शुभम ताड प्रथम क्रमांक,सार्थकी शेटे द्वितीय क्रमांक,प्रणिती पवार तृतीय क्रमांक. मृण्मयी गायकवाड आणि जान्हवी सरदार यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. तर इयत्ता ७वी आणि ८वी मधील रांगोळी स्पर्धेमधील विजय विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे. आदिती नागणे प्रथम क्रमांक, आर्या देशमुख द्वितीय क्रमांक, सानिया शेख तृतीय क्रमांक, तर श्रावणी भोसले, श्रावणी मस्के सांची मोरे अनन्या गवळी यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. यावेळी डॉ.भातलवंडे म्हणाले की तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ पासून आणि काय आजार होतात यामध्ये कॅन्सर,तोंडाचे आजार,फुप्फुसाचे आजार,श्वसनाचे आजार, आणि या आजारावर करायला लागणाऱ्या उपाययोजना याची देखील माहिती दिली.तसेच सर्व विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्त शाळा शाळेतील परिसर यासाठी शपथ देखील दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका एल.एम.बोडके तर आभार प्रदर्शन सचिन निकम यांनी केले. सर्व विजय विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष एच.एम.बागल उपाध्यक्ष बी.डी.रोंगे संस्थेचे संस्थापक सचिव.डॉ.बी.पी रोंगे ज्येष्ठ विश्वस्त व खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी अभिनंदन केले.
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१