आरोग्यसोलापूर

प्रवाशाने विष प्राशन केल्याने एसटी बस थेट सिव्हिल हॉस्पिटलला.

24 मराठी न्यूज सोलापूर प्रतिनिधी प्रकाश इंगोले

कराड डेपोची बस उस्मानाबादला निघाली होती. सोलापूर बस स्थानकातून अनेक प्रवाशी उस्मानाबाद आणि तुळजापूरकडे निघाले होते. मात्र सोलापूर बसस्थानकातून बस निघाली असता, काही अंतरावर एका प्रवाशाने विष प्राशन केले.

ही बाब कंडक्टर व ड्रायव्हरच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान साधत एसटी बस थेट सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलकडे वळवली. प्रवाशाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून त्यावर उपचार सुरू केले. सिद्धेश्वर गुरुराज स्वामी (वय 53 वर्ष, द्वारका नगरी, विजापूर रोड, सोलापूर शहर) असे प्रवाशाचे नाव आहे. एसटी महामंडळाचे अधिकारी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!