सामाजिक

सभासद व कामगार मोठ्या प्रमाणात नाराज असल्याने बदल अपेक्षित असून निवडणुकीत त्याचा उद्रेक दिसेल : – घाडगे .

भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अटळ .

२४ मराठी न्यूज राजेश शिंदे / मोहोळ तालुका प्रतिनिधी .

भिमा कारखान्यात आपली सत्ता स्थापन होताच स्व . सुधाकरपंत परिचारक यांचे भव्य स्मारक कारखानास्थळी उभा करणार असल्याचा मानस पंढरपूर बाजार समितीचे सभापती दिलीप आप्पा घाडगे यांनी व्यक्त केला .रविवारी दि . ३० रोजी सुस्ते येथे भीमा बचाव संघर्ष समितीची विचार विनिमय बैठक पार पडली.यावेळी दिलीप आप्पा घाडगे बोलत होते . मागील अनेक दिवसांपासून भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार का .. ? अशी चर्चा सुरू होती

मात्र आजच्या या बैठकीमुळे भिमाची निवडणूक होणारच हे निश्चित झाले आहे . स्व . सुधाकरपंत परिचारक व मा आ राजन पाटील यांनी शेतकऱ्यांचे हित जोपासत भीमा सहकारी साखर कारखान्याला जे वैभव प्राप्त करुन दिले होते ते वैभव विद्यमान सत्ताधाऱ्यांनी धुळीस मिळविले आहे . येणाऱ्या निवडणुकीत कारखान्याचे हे वैभव पुन्हा मिळविण्यासाठी आ . प्रशांत परिचारक व माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भिमा बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून निवडणुकीत उतरणार आहोत . दिलीप घाडगे म्हणाले की , विद्यमान सत्ताधाऱ्यांनी कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा केला आहे . शेतकरी कामगार , निवृत्त कामगार यांची हक्काची देणी अद्याप दिलेली नाहीत . यामुळे सभासद व कामगार मोठ्या प्रमाणात नाराज आहेत . त्यांना बदल अपेक्षित आहे . या निवडणुकीत त्याचा उद्रेक दिसेल . यावेळी अजिंक्यराणा पाटील , कल्याणराव पाटील , रतिलाल गावडे , रमाकांत पाटील , दिलीप चव्हाण , सिताराम रणदिवे , प्रभाकर भोसले , सुनिल सातपुते , बाबासाहेब पाटील , बाळासाहेब लोकरे , प्रकाश कस्तुरे , सुनील सातपुते , प्रकाश चवरे , समाधान शेळके आदींसह मोहोळ व पंढरपूर तालुक्यातील भिमा सहकारी साखर कारखान्याचे सभासद बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!