विशेष

सोलापूर जिल्हा परिषदेची देशात विशेष कामगिरीस्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण -2021 मध्ये 955.53 गुणांसह राज्यात द्वितीय.

२४’मराठी न्यूज पंढरपूर ,श्री नंदकुमार देशपांडे

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण -2021 मध्ये सोलापूर जिल्ह्याने देशात चांगली कामगिरी केली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने 1000 गुणांपैकी 955.53 गुणे घेत राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वच्छ सुंदर शाळा तसेच स्वच्छतेबाबत विविध उपक्रम हाती घेतले होते. जिल्ह्याने देशात पहिल्या टॉप 50 मध्ये स्थान पटकाविले आहे. देशात एकूण 709 जिल्हे आहेत. 1000 गुणापैकी 955.53 गुण सोलापूर जिल्ह्याने प्राप्त केले आहेत. नुकताच केंद्र शासनाचे जलशक्ती मंत्रालयाने अहवाल प्रकाशित केला आहे. देशात स्वच्छ जिल्हा म्हणून गौरव झालेला सिंधुदुर्ग जिल्हा गुणांकनात देशात दहावा आहे. राज्यात सिंधुदुर्ग पहिला (983.04 गुण ), सोलापूर द्वितीय (955.53 गुण) आणि सांगली तृतीय (939.13 गुण) मिळाले आहेत. फिडबॅकमध्ये सोलापूर जिल्हा देशात द्वितीय आहे. मात्र यंदापासून फिडबॅकसाठी देण्यात येणार पुरस्कार जलशक्ती मंत्रालयाने बंद केला आहे

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत श्री. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोत्तम कामगिरी सोलापूर जिल्हा परिषदेने केली आहे. महिला व बाल कल्याण विभाग, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, उमेदसह सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी मोठे योगदान दिले आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील कर्मचारी यांनी पुढाकार घेतला होता. श्री.स्वामी यांनी यासाठी मोहीम स्वरूपात काम केले. सर्व विभाग प्रमुखांना विश्वासात घेतले. त्यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव, सर्व गटविकास अधिकारी यांनी सहकार्य केले आहे. सर्व विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी पंचायत, शिक्षण व आरोग्य तसेच सर्व मुख्याध्यापक, ग्रामसेवक, केंद्र प्रमुख, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बीआरसी व सीआरसी तसेच जिल्हा स्तरावरील पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सल्लागार यांनी महत्वाचे योगदान दिले आहे

जिल्हा परिषद स्वच्छतेत देशात अग्रेसर – सीईओ दिलीप स्वामीसोलापूर जिल्हा परिषेदेने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 मध्ये चांगली कामगिरी केली आहे. वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापनसाठी परसबागा, शोषखड्डे, स्वच्छ व सुंदर शाळेमुळे शालेय स्वच्छतागृह, घनकचरा व्यवस्थापन अशा एक हजार गुणांचे रॅंकिंग होते. प्रत्यक्ष केंद्रीय समितीने या कामांची पाहणी केली. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनत घेतली आहे.

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!