आरोग्य

पोलीस भरतीसाठी ७२७ उमेदवारांची उपस्थिती.

२४ मराठी न्यूज,सोलापूर / प्रतिनिधी

पोलीस हेडकॉटरवर सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत शनिवारी ७२७ उमेदवार शारीरिक ‘चाचणीसाठी पात्र ठरले.पोलीस आयुक्तालयाकडून दर दिवशी ९०० उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात येत आहे. शनिवारी ९८१ उमेदवारांना बोलवण्यात आले होते, त्यापैकी ७७७ उमेदवार प्रत्यक्षात हजर होते. पैकी त्यातील ५० उमेदवार शारीरिक चाचणीसाठी अपात्र ठरले. तर २०४ उमेदवारांनी शारीरिक चाचणीस दांडी मारली. ७२७ उमेदवार हे शारीरिक चाचणीस पात्र ठरले.शहर व ग्रामीण पोलीस दलाअंतर्गत चालकांची१०१ तर पोलीस शिपायांची १२४ पदे भरली जाणार आहेत. ग्रामीण पोलिसांनी २ ते १० जानेवारीपर्यंत मैदानी परीक्षा घेण्याचे नियोजन केले असून, ८ जानेवारीला (रविवारी) एक दिवस सुट्टी दिली आहे. ग्रामीण पोलिसांकडे २८ चालक पदांसाठी १ हजार ४२२ तर २६ पोलीस शिपाई पदांसाठी १ हजार ४५१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. शहर पोलीस आयुक्तालयाकडे ७३ चालक पदांसाठी ५ हजार ५५८ आणि ९८, पोलीस शिपायांसाठी ६ हजार ६२१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. शहर पोलीस आयुक्तांनी १२ ते १६ जानेवारी या काळात ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त परीक्षेला सुट्टी दिली आहे. त्यानंतर ठरलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा होणार आहे.

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!