होळी साठी चक्क सोन्याची बादली अन् पिचकारी.
24 मराठी न्यूज नेटवर्क
रंगांची उधळण करणारा होळी, धुलीवंदन हे सण साजरे करण्यासाठी बाजारपेठा रंग, पिचकाऱया अशा विविध वस्तूंनी सजल्या आहेत, मात्र नवाबांचे शहर अशी ओळख असलेल्या लखनौच्या रस्त्यांवर सोन्या-चांदीच्या बादल्या आणि पिचकारी घेऊन होळी खेळण्याचा नजारा बघायला मिळेल.लखनौमध्ये पहिल्यांदाच होळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराफ बाजार चौकात पहिल्यांदाच होळीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या पिचकारी व बादल्या विक्रीसाठी आल्या आहेत. चांदीच्या पिचकारीची किंमत 2 हजारांपासून ते 10 हजारांपर्यंत, तर चांदीच्या बादलीची पिंमत 5 हजारांपासून तीस हजारांपर्यंत आहे, तर सोन्याच्या आणि हिऱयांच्या एका बादलीची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे.
सोन्या-चांदीच्या बादल्या आणि पिचकारी घेतल्यास पुढील अनेक वर्षे होळी खेळण्यासाठी तिचा वापर होऊ शकतो. दरम्यान, सराफ बाजारात अशी पिचकारी व बादली खरेदी करण्यासाठी अनेकांनी बुकिंगही केले आहे.सराफा असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष आदिश जैन यांनी सांगितले की, याआधीही बाजारात चांदीच्या घागर आणि बादल्या येत होत्या, मात्र यावेळी लोकांची मागणी जास्त आहे. रंग खेळण्या व्यतिरिक्त आई-वडील मुलीला तिच्या लग्नानंतरच्या पहिल्या होळीला भेट देऊ शकतात.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*