माहेर पक्षी घरकुल सरकोली ता पंढरपूर जि सोलापूर पर्यटन स्थळ
पंढरपूर प्रतिनिधी
मुलगी झाली घरचे नाराज झाले. तिला सर्व काही दुय्यम .ती घरात लहानाची मोठी होते. जसजशी तिला समज येऊ लागते तस तशी ती भावंडाची, आई वडील यांची काळजी करू लागते. काहीही असो पहिल भावाला द्या. नंतर मला .आई वडील जेवले का❓ औषध पाणी घेतले का❓ असे विचारणारी, आईला स्वच्छते पासून स्वयंपाक घरात धुन्या भांड्यात मदत करणारी , सर्वांच्या शिक्षणाचा खर्च भागत नसेल तर मी शिक्षण थांबवते पण दादाला शिकू द्या,मी नंतर जेवेण. अगोदर दादाला जेवण वाढा म्हणणारी मुलगीच असते. मुलगी घरातील प्रत्येक क्षण टिपते .घरातील प्रत्येकाची, घरात येणाऱ्या प्रत्येक नातेवाईकांची काळजी घेणारी मुलगीच असते. ती मोठी होते लग्नाचे वय होतं. आई वडील तिच्या लग्नाची विचारपूस करतात. यावेळी ती म्हणते थांबा जरा दादाच शिक्षण आहे. घरचा खर्च आहे. कर्ज थोडेफार आहे. जरा परिस्थिती सुधारू द्या. मग पाहू माझ्या लग्नाचं. लग्न जमत हुंडा, सोन, भांडी ,कपडे, रुखवत साहित्य यांच्या पैशाची यादी होते. ते सर्व लग्नानंतर तिच्या सासरच्या घरी जाणार असत. तरी पण ती म्हणते कशाला एवढा हुंडा, सोनं, कपडे, रुखवत साहित्य. एवढा मोठा खर्च करू नका. आणखी तुम्हाला माझ्या लग्नामुळे कर्जाचा बोजा वाढेल. त्यांना सांगून टाका आमच्याकडून तुम्हाला इतका खर्च करता येणार नाही. त्यावेळी आई-वडील म्हणतात .”असुदे ग परत परत हा खर्च नसतो”.आम्ही आमच्या संसारात काही करतो परंतु पाहुणे नाराज होऊ नयेत. त्यावेळी मुलगी म्हणते हाव तर माझं लग्न रद्द करा. पण तुमच्या डोक्यावर माझ्या लग्नाच्या कर्जाचा डोंगर उभा करून मला सासरी जायचे नाही. लग्न जवळ येऊ लागतं घरात लग्न साहित्य ,पैसा ,कपडे भांडी, रुकवत साहित्याची जमवाजमा सुरू होते. ती साहित्याकडे पाहते. घरातून दारात, दारातून आत बाहेर करते .भावंड आई-वडील आजी-आजोबा यांच्याकडे पाहते .तिच मन खिंन्न होत. मी या घरातून जाणार. या सर्वांना सोडून परक्या घरी जाणार. नको .हे लग्नचं नको. असे मनात म्हणते .मला आज्जी आजोबा आई वडील यांनी हातावरच्या फोडाप्रमाणे सांभाळले. माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट पुरवली. भावंडा बरोबर माझेही लाड केले. कितीही हालाखीची परिस्थिती आसली तरी माझा चांगला सांभाळ केला. रात्रंदिवस मला सावली दिली. संस्कार दिले .चांगले वळण लावले. घरात खेळताना माझी आणि भावंडाची भांडण झाली की, आई वडील आज्जी, आजोबा प्रथम भावंडाना रागवत .माझ्यासाठी त्यांना मारत. परंतु मला काही म्हणत नसत. आज्जी तर मला मंडीवरून उतरत नसे. मला आंघोळ घालणे,केस विंचरणे, पावडर गंध करणे, जेवण दूध देणे हे सर्व करीत असे. गल्लीत कोणी मुलगा, मुलगी मला काय म्हणाले तर आज्जी त्यांच्या घरी भांडायला जात असे. एवढे माझे लाड केले.या घरातून मी परक्या ठिकाणी जानेच नाही. या लोकांना सोडून मी कशी जाऊ शकते. लग्न करून परक्या घरी मुलीने जाणे कोणी ही प्रथा पाडली. अशा प्रथा नसाव्यात. लग्नाच्या वेळी पाहुणेरावळे सर्व लोक लग्नात जमलेले असतात.तिच्या डोक्यावर अक्षता पडतात. तिला रडण्याचा हुंदका येतो. परंतु ती समोरचा जनसमुदाय पाहून आवरते .लग्न होतं पाहुणेरावळे निघून जातात. शेवटी घरचेच लोक थांबतात .ती नवऱ्यासोबत सासरच्या गाडीत बसण्या अगोदर आई-वडिल आजी-आजोबा, भावंडाचे चेहऱ्याकडे पाहते. त्यांचे व्याकूळ झालेल्या चेहऱ्यावरील भाव पाहून तिला रडू कोसळते .तिच्याबरोबर सर्वांच्या डोळ्यातून पाणी येते .ती गळा पडून रडू लागते. सासरच्या मंडळीकडून आवाज येतो .तुम्ही काही काळजी करू नका .आम्ही मुलीप्रमाणे संभाळ करू. ती डोळ्यातून अश्रू ढाळत तशीच नवऱ्याच्या सोबत सासरच्या गाडीत बसते .गाडी चालू लागते. प्रवासात तिच्या डोळ्या समोर माहेर, माहेरकडील माणसे ,तिचा आजपर्यंतचा माहेर मधील जीवन प्रवास समोर उभा राहतो. ज्याच्याबरोबर पुढील आयुष्य घालवायचे आहे तो नवरा सोबत आहे. तरीही त्याच्याकडे तिचे आत्मिक लक्ष नसते. बळबळ त्याच्यासोबत बसल्यासारखं होतं. ती सासरी नवऱ्याच्या घरी जाते. गाडीतून उतरते. तर समोर सर्व काही नवीन. घर, घरातील सर्व काही नवीन. तिचं मन दुखी होते. मन लागत नाही. सारखी माहेरची आठवण येते. अन्नपाणी जात नाही. झोप येत नाही .मन बेचैन होते. माझ्यासाठी माझ्या आई-वडिलांनी काय काय केलं. माझा सांभाळ केला. आणि मी आता परक्या घरी आले. इथून पुढचा प्रवास कसा होणार. लग्नानंतर सोळक्याचा कार्यक्रम उरकून माहेरी निघण्याची तयारी सुरू होते. कधी एकदा आई आज्जीच्या गळ्यात पडते. भावंडांना डोळे भरून पाहते. वडिलांजवळ जाऊन तुमची तब्येत चांगली आहे ना .गोळ्या वेळेवर घेता का. असे विचारेन . माहेरी पोचते घरातील सर्वांना पाहून मन आनंदित होते. सासरची चर्चा होते .काही दिवस माहेरी राहून परत सासरी जाते .सासरी राहत असताना माहेरची सारखी आठवण येत राहते .अधून मधून कार्यक्रम, सुखदुःखाच्या निमित्ताने माहेरी येत राहते .जसं पक्षाच्या पिल्लाचा सांभाळ पक्षी करतो .खाण्यापिण्याची ऊन वारा पाऊस थंडीची काळजी घेतो. पिल्लू मोठे झाले .त्यास उडता आले की, ते निसर्गात उडून जाते. तशीच मुलीची अवस्था असते .या गावातील सासरी असणाऱ्या मुलींनी माहेरी यावं .असं मला वाटतं. सासरी असणाऱ्या एखाद्या बहिणींचे आई ,वडील वारले असतील किंवा ते वयाने कितीही ज्येष्ठ असले तरी त्यांनी आपल्या माहेरी वर्षातून किमान दोन-तीन वेळा भेट द्यावी. बंधू भाव कायम टिकून राहावा. या निमित्ताने मला एक विनंती करावी वाटते.आपण क्षणीक आनंदा करीता फटाका फोडून 🔊आवाजाचा स्फोट💥करतो .त्या फटाकेच्या आवाजाने पक्षी🐦 घाबरून झाडावरून,घरठ्यातुन घाबरून उडून जातात.तसे बहीण आपल्या गावी माहेरी आल्यावर.कोणत्या तरी भांडणाचा स्फोट घरात करु नये.त्यामुळे माहेरी आलेल्या मुलींना प्रचंड दुख होईल.याची दक्षता सर्व भावंडानी घ्यावी.मुलींनी माहेरी येताना माहेर मध्ये आपल्याला निसर्गाची सावली राहावी. एखादं फळ खाण्यास मिळावा. म्हणून एक तरी फळाचं रोप घेऊन यावं .या पर्यटन स्थळावर लावाव. भावंडांनीही आपल्या भगिनींना सन्मानाने किमान दोन-तीन वेळा गावी आणावं .त्यांना बंधुप्रेम द्यावे. मी सरकोली पर्यटनस्थळ निर्मितीचे काम सुरू केल्यापासून माहेर पक्षी घरकुल ची कल्पना रंगवून ठेवली होती. ती आता उदयास आली आहे. या गावातील सासरी असणाऱ्या माझ्या सर्व भगिनींना विनंती आपण सरकोली पर्यटन स्थळ येथे भेट दिल्यास *माहेर पक्षी घरकुलला* भेट द्यावी. व फोटो काढून आपल्या सर्व वाटसप ग्रुपवर, फेसबुक वर शेअर करावेत. ही पक्षांची घरटी. बाभळीच्या लाकडाच्या पाऊण इंच फळी पासून 18 × 18 इंची साईज मध्ये तयार केली आहेत. दहा हजार रुपयाची बारा घरटी बनवून घेतली. एका घरठ्याचे वजन साडेनऊ ते दहा किलो आहे. त्यांना सहा प्रकारचे रंग देण्यात आले आहेत. ते सरकोली येथील दुर्गा वरील गोडाऊनच्या 25 फूट उंच प्लेन असलेल्या भिंतीला फिट करण्यात आली आहेत. त्यावर शेडनेटची सावली करण्यात येणार आहे .पक्षांना जागेवर दानापाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामाहेर पक्षी घरकुलचा खर्च 25 हजार रुपये आला आहे .त्याचा सर्व खर्च माझ्या भगीनी सौ मंदाकिनी सुरेंद्र पाटील ,माचनूर ता मंगळवेढा सध्या पुणे व सौ नंदाबाई संभाजी चव्हाण ढोकबाभळगाव ता मोहळ यांनी केला आहे. सरकोली पर्यटन स्थळास भेट देणाऱ्या प्रत्येक स्त्रियांनी या घरट्याकडे पाहिले की येथील माहेर पक्षी घरकुल चे नाव वाचले की आपापल्या माहेरची ,माहेरच्या माणसांची आठवण येईल . आणी ती यावीच असे मला वाटते.सर्व बंधू, भगीनींनी पक्षांसाठी आप आपल्या घरी घरटी बनवावित. म्हणजे पक्षावरील प्रेम दृढ होईल. पक्षी हे माणसांचे जीवन आहे. पक्षी जगला तर धान्य पिकेल. माणूस जगेल. पर्यावरणाचे संतुलन राहील. (कृपया विनंती🙏हा संदेश आप आपल्या भगिनींना सोशल मीडियावर पाठवावा, व इतर ग्रुपवर पाठवावा) सेवेकरिता- बंधू विलास श्रीरंग भोसले मा पोलीस अंमलदार 9923433535.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*