शेतकऱ्यांच्या सहलीची राज्यात चर्चा ! पीकअपने विमानतळावर ,तर थेट विमानाने तिरुपती दर्शनला.
24 मराठी न्यूज नेटवर्क
पुणे -शेतकरी कधी काय करेल याचा अंदाज भल्याभल्यांना नसतो. अनेकांची इच्छा असते की, विमानाने एकदा तरी प्रवास करावा, अशी इच्छा बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावातील शेतकऱ्यांची होती.या शेतकऱ्यांनी तिरूपती बालाजी देवस्थानच्या दर्शनाचा दौरा ठरवला. त्यासाठी दोन पीकअप भरून ३४ पुरूष व महिला थेट पुणे लोहगाव येथील अंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. यावेळी अनेकांनी त्यांचे लक्ष वेधून घेतले.यावेळी या शेतकऱ्यांचे येथील कर्मचारी व इतर प्रवाशांना देखील कौतुक वाटले. या शेतकऱ्यांचा विमानतळावर उतरतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या शेतकऱ्यांनी दोन पीकअपमधून जायचे ठरवले एखाद्या लग्नाचे वऱ्हाड जावे तसे हे शेतकरी पिकअपमधून विमानतळावर पोहोचले.बाबूर्डी गावातील शेतकऱ्यांनी केलल्या या प्रवासाची चांगलीच चर्चा झाली. तसेच या विमान प्रवासामध्ये असलेले वृद्ध चांगलेच हरखून गेले होते. विमानाने जायचा निर्णय गावातील ३४ शेतकऱ्यांनी घेतला.यामध्ये सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, पोलीस पाटील राजकुमार लव्हे, नितिन लव्हे, दिलीप लव्हे आदी सहभागी झाले. हे सर्व शेतकरी दोन पीकअप जीप करून लोहगाव विमानतळावर पोहोचले. यावेळी अनेकजण त्यांच्याकडे बघतच राहिले.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*