आरोग्य

लक्ष्मी टाकळीरस्त्याच्या दोन्ही बाजूला -कचराच कचरा ग्रामपंचायत लक्ष देणार का ?

24 मराठी न्यूज पंढरपूर श्री नंदकुमार देशपांडे

पंढरपूर शहरालगत सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या लक्ष्मी टाकळी या गावांमध्ये टाकळी ग्रामपंचायतकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही0 बाजूला कचऱ्याची ढीग लागलेले असून हे कीळसवाने दृश्य येता जाता नागरिकांना पाहण्यास मिळते एकीकडे राज्यात ग्रामपंचायत ग्रामस्वच्छता स्वच्छता अभियान व इतर लोकाभिमुख विकासाच्या बाबतीत प्रथम क्रमांक येण्यासाठी धडपडताना दिसत आहेत परंतु याला लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत अपवाद खेदाने आहे असे म्हणावे लागेल नवीन ग्रामपंचायत सदस्य सत्तेवर विराजमान होऊन जवळजवळ एक वर्ष पूर्ण होत आली असून टाकळी गाव असो व प्लॉट धारकरी असो सर्व विकासकामे ठप्प झाले असून केवळ घोषणाबाजीत झाली असे म्हणावे लागेल आजही प्रत्येक भागात कचऱ्याचे ढीग तुंबलेली गटारे पडलेला कचरा यातून स्वैरपणे वावरणारे वराह हे सर्व दृश्य सर्वजण डोळ्यातून आंधळे कारण असून बहिरे अशा परिस्थितीत वावरत आहेत लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी यांना तर विकासाची काही सुचक नाही असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही वास्तविक विकासाच्या बाबतीत ग्रामसेवकाची ग्रामविकास अधिकाऱ्याची महत्त्वाची भूमिका असताना सुद्धा केवळ ऑफिसला येणे आणि जाणे यापलीकडे त्यांचे लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे वरील दृश्यावरून दिसून येते काही महिन्यापूर्वी टाकळी गावातील युवकांनी एकत्र येऊन हा पडलेला कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली होती परंतु आत्ता मोठ्या प्रमाणात अण्णाभाऊ साठे समोरील परिसर हा परिसर कचरामुळे झाल्याचे दिसून येत आहे शासनाने घनकचरा नियोजन व इतर सोयीसाठीही नियोजन केले असताना त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे असताना केवळ शहकाट याचेच राजकारण चालू आहे विकासाच्या बाबतीत कोणालाच गांभीर्य नाही असे खेदाने म्हणावे लागेल सध्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत वर भाजपा शिवसेना अर्थात शिंदे फडणवीस गटाच्या परिचारक साठी यांच्या ताब्यात ही ग्रामपंचायत असून पूर्ण बहुमत असताना सुद्धा विकास कामाकडे सर्व सदस्यांचे दुर्लक्ष होत आहे असे म्हणल्यास गैर ठरणार नाही नागरिकांनीही आपला कचरा साठवून तो खुल्या जागेत व रस्त्यावर टाकून शहराचे गावाचे विद्रोपी करण करू नये कारण या घाणीचा त्रासही आपल्यालाच होणार आहे याचीही जाणीव मोकळ्या जागेत व रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांनी रहिवाशांनी घेणे तितकेच गरजेचे आहे तर ग्रामपंचायतीने लक्ष घालून युद्धपातळीवर हा पडलेला कचरा त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧- lakhansalunkhe75@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!