माढा तालुक्यातील चिंचोळी येथे ऐतिहासिक सर्व्हे करतांना पेशवेकाळातील दोन शिलालेख सापडले.
इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर
24 मराठी न्यूज माढा प्रतिनिधी
माढा चिंचोळी येथील मारूती मंदिराच्या प्रांगणात चिरेबंदी विहीरीच्या तटबंदीवर कोरलेला आठ ओळीचा देवनागरी लिपितील पहिला शिलालेख अणवेकर यांच्या निदर्शनास आला त्या शिलालेखात श्री गणेशाय नम: शके १६४५ शोथकृत सवंत्सर श्रावणमास वद्य पक्ष अष्टमी ८ सोमवार रोहिणी नक्षत्र म्हणजे (इ.स १७२३ सोमवार दिनांक २९ जुलै १७२३ )ते दिवशी राजेश्री सिद्ध माळी त्यांचा पुत्र पद्ममाळी,त्याची स्त्री माणकाई तिचा पुत्र महाद माळी त्याचा पुत्र पद्म माळी याचे हाती कुंपण विहिरीचे काम आपले वडिलाचे पुण्य करविले.असे कोरलेले आहे.यावरून ही विहीर परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी बांधली होती, असे त्यांना दिसून आले आहे. विहीर बांधणे हे पुण्याचे कार्य आहे असे धनिक लोक मानत असत.असे मत अणवेकर यांनी व्यक्त केले. त्यांना रोहन होनकळस याचे सहकार्य लाभले. दुसरा शिलालेख चिंचोली गावातील शेतामध्ये असलेल्या समाधीच्या मध्यभागी अणवेकर यांना आढळून आला हा शिलालेख मराठे काळातील असून तो सुद्धा देवनागरी लिपीत कोरण्यात आला आहे.शिलालेख नऊ ओळीचा आहे. त्याचे ठसे घेण्यात आले आहेत. त्याचे वाचन लवकरच केले जाईल असे इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांनी सांगितले.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶*आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*