शाब्बास पठ्ठय़ा ! बुटांमधून वीज निर्मिती ९ वी च्या सौविक सेठची उत्कृष्ट कमाल.
24 मराठी न्यूज नेटवर्क
इयत्ता ९ वी शिकणाऱ्या सौविक सेठ या मुलाने स्मार्ट शूज तयार केले आहेत. सौविकने असे बूट तयार केलेत, जे वीज निर्मिती करू शकतील. महत्त्वाचे म्हणजे त्या विजेच्या साह्याने मोबाईल, जीपीएस ट्रॅकिंगपासून कॅमेऱ्यापर्यंत सर्व काही चार्ज करता येणार आहे.सौविक सेठ हा पश्चिम बंगालच्या चंदेरनगर कनाईलाल विद्यामंदिरात शिकतो. काकांच्या प्रोत्साहनाने त्याने स्मार्ट शूज प्रोजेक्ट केला आहे. याबद्दल त्याला शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनात बक्षीसही मिळाले आहे. शूज घालून चालल्याने वीज निर्माण करता येते, असा दावा सौविकने केला आहे. यातून 2000 MAH बॅटरी सहज चार्ज होण्याची शक्यता आहे. ही बॅटरी फक्त एक किलोमीटर चालल्यावर चार्ज होऊ शकते. दरम्यान, बुटाच्या बाहेर ही सगळी प्रणाली लावण्यात आली आहे. येत्या काळात बुटाच्या सोलला ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे.खरं तर सौविकने टाकाऊ वस्तूंपासून स्मार्ट बूट बनवला आहे. या शूजमध्ये जी पी एस प्रणाली आहे. त्यामुळे बूट घातलेल्या व्यक्तीचा ठावठिकाणा ट्रक करू शकतो. याशिवाय बुटांना स्पाय कॅमेरेही जोडलेले आहेत. चालण्याने गतिज ऊर्जा निर्माण होते आणि त्यातून ही वीज निर्माण होत असल्याचे सौविकने सांगितले आहे. या प्रकल्पासाठी चांगल्या कंपनीकडून प्रोत्साहन मिळण्याची गरज असल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे सगळीकडे त्याच्याच कौतुक होत आहे
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶*आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*