जागतिक तंबाखू विरोधी दिन, प्रांत कार्यालयात तंबाखू विरोधी शपथ.
24 मराठी न्यूज पंढरपूर श्री नंदकुमार देशपांडे
पंढरपूर, दि. 31 (उ. मा. का.) : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे उपस्थित अधिकाऱ्यांना सामुहिकपणे तंबाखु विरोधी शपथ देण्यात आली राज्यात सदर व्यसनाचे प्रमाणकमी करण्यासाठी सर्वांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे उपस्थित सर्व तालुका विभाग प्रमुख तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांना तंबाखु विरोधी
शपथ देण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जून भोसले, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, महावितरणचे कार्यकारी अभियंता बी.ए.भोळे तसेच संबधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते. तंबाखु विरोधी शपथ उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तंबाखु विरोधी शपथ डॉ. प्रसन्न भातलवंडे यांनी वाचन करुन उपस्थित अधिकाऱ्यांना दिली तसेच जिल्हा स्तरावर तंबाखू नियंत्रण कक्षामार्फ़त तयार करण्यात आलेली, लिंक, क्यु आर कोड यावेळी सर्वाना देण्यात आला
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com