सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
साखर कारखाना निवडणुकीत विरोधक एकत्र आल्याने ही निवडणूक दुरंगी होणार हे स्पष्ट
24 मराठी न्यूज नेटवर्क
पंढरपूर : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे, कारखाना निवडणूकीसाठी १७६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज सोमवार शेवटचा दिवस आहे. या निवडणूकीतून कोण कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे सहकार शिरोमणी साखर कारखाना निवडणूकीसाठी सत्ताधारी चेअरमन कल्याण काळे, विठलचे चेअरमन अभिजीत पाटील, दिपक पवार, बी. पी.रोंगे गटाकडून विक्रमी २६८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. ‘अर्ज छाननीवेळी उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आले. यामुळे कोणाचे उमेदवारी अर्ज बाद होणार याकडे लक्ष लागले होते. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी आक्षेप घेण्यात आलेले अर्ज मंजूर केले. अर्ज छाननीत विविध कारणांनी ९२ उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले. झाले आहे. यामुळे निवडणूकीत १७६ अर्ज आहेत. अर्ज माघारी घेण्याची मुदत ५ जून पर्यंत आहे, या दिवशी कोण कोण अर्ज मागे घेणार याकडे लक्ष लागले आहे. निवडणूकीत किती उमेदवार उभा रहाणार याचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. साखर कारखाना निवडणुकीत विरोधक एकत्र आल्याने ही निवडणूक दुरंगी होणार हे स्पष्ट
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com