सोलापूर विभागात लवकरच इलेक्ट्रीक बस धावणार -अजित पाटील
24 मराठी न्यूज पंढरपूर श्री नंदकुमार देशपांडे
पंढरपूर – सोलापूर विभागात लवकरच इलेक्ट्रीक बस धावणार असुन चार्जिंग स्टेशनचे काम पुर्ण होत आले आहे अशी माहिती एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी अजित पाटील यांनी वर्धापनदिन समारंभाच्या अध्यक्षपदावरून बोलताना दिली. एसटी महामंडळाच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त पंढरपूर बसस्थानकात आयोजित समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून अ.भा.ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास, जिल्हा संघटक दीपक इरकल,शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल कुंभार उपस्थित होते . प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली. “प्रवाशांच्या सेवेसाठी” हे ब्रीदवाक्य घेऊन प्रवासी वाहतूक करीत असताना स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी परिस्थिती नुसार बदलले पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे.तसेच तंदुरुस्त बस,स्वच्छ बस,स्वच्छ बसस्थानक, व आपुलकीचा प्रवासी संवाद एवढ्या माफक अपेक्षा प्रवाशांच्या आहेत.त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना चांगले वेतन व भत्तेही मिळाले पाहिजेत असे मत जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी याप्रसंगी व्यक्त केले
प्रवाशांना येणाऱ्या अडचणींची सोडवणुक तत्परतेने झाली पाहिजे त्यासाठी पुरेसे साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे अशी आग्रही मागणी जिल्हा संघटक दीपक इरकल यांनी याप्रसंगी बोलताना केली. यावेळी स्थानक प्रमुख रत्नाकर लाड, वाहतूक निरिक्षक पंकज तोंडे, ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव सुहास निकते, सदस्य पांडुरंग अल्लापूरकर, तालुकाध्यक्ष विनय उपाध्ये, उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, सचिव प्रा. धनंजय पंधे, पत्रकार सुदर्शन खंदारे,वाहतूक निरीक्षक, पंडित शिंदे, सुमित भिंगे,सुभाष कांबळे इ. अधिकारी, कर्मचारी, प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी सजावट श्रीमती विजया भूमकर,श्रीमती नेहतराव,पाटील ,महामुनी यांनी तर स्थानक सजावटीचे काम वाहक सौरभ कदम केले. या समारंभासाठी वाहतूक नियंत्रक गवळी,कवले, वाहक अवताडे ,दिवाण यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन वाहतूक निरीक्षक दळवे यांनी केले तर आभार प्रदर्शन वाहतूक नियंत्रक सोमनाथ अष्टेकर यांनी केले. याप्रसंगी एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांच्या निधनाबद्दल व बालासोर रेल्वे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना श्रध्दांजली अर्पण करुन समारंभाची सांगता झाली.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com