लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये जागतिक पर्यावरण दिन संपन्न.
24 मराठी न्यूज पंढरपूर प्रतिनिधी संपत लवटे.
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल मध्ये ५ जून जागतिक पर्यावरण दिन संपन्न झाला. जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्टॉक होम कॉन्फरन्स ऑन द ह्युमन एन्व्हायरमेंट (५ जून १९७२) येथे केली.याचा परिणाम मानवी संवाद आणि पर्यावरणाच्या एकात्मतेवर झालेल्या चर्चेतून झाला होता.दोन वर्षानंतर १९७४ मध्ये “फक्त एक पृथ्वी” या थीम सह पहिला जागतिक पर्यावरण दिन आयोजित करण्यात आला.अशी माहिती स्कूलच्या प्राचार्या.डॉ.जयश्री भोसले यांनी दिली. पुढे पर्यावरण दिनाचे महत्त्व सांगताना आपली पृथ्वी आणि जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी पर्यावरण सुरक्षित असणे.अत्यंत आवश्यक आहे.लोक अशा प्रकारे जीवन जगत आहे की त्यामुळे पर्यावरण करण्यात आले आहे.जगातील देश आधुनिक तिकडे वाटचाल करत आहेत.त्यामुळे सर्वत्र नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर दिवसेंदिवस वाढला आहे.माणूस आणि पर्यावरणाचे नाते अतूट आहे. निसर्गाशिवाय जीवन शक्य नाही. अशा परिस्थितीत मानवाला निसर्गाशी जुळवून घ्यावेच लागते अशी माहिती प्राचार्या डॉ.जयश्री भोसले यांनी दिली. या पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांनी आंबा,सिताफळ, चिंच,पेरू,जांभळ,बदाम, कडुलिंब अशोक,शेवंती,सदाफुली,गुलाब,कोरफड,अशाप्रकारे फळांच्या फुलांच्या औषधी वनस्पती इत्यादींची रोपे विद्यार्थ्यांच्या हस्ते लावण्यात आली. ह्या वृक्षारोपणावेळी विभाग प्रमुख,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते. पर्यावरण दिनानिमित्त संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे,अध्यक्ष.एच.एम.बागल, उपाध्यक्ष.बी.डी.रोंगे,खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी शाळेत वृक्षारोपण केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com