श्रावणातील महत्वाचा सण म्हणजे राखी पौर्णिमा भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्यांची वीण म्हणजे रक्षाबंधन श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा करण्याची प्राचीन परंपरा आपल्या महाराष्ट्रात आहे येत्या बुधवारी साजरा होणाऱ्या राखी पौर्णिमेचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळा नंबर ४ मोहोळ येथे पर्यावरणपूरक व टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ राखी तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. अल्प खर्चात टाकाऊ वस्तु पासून राखी बनवण्याचे तंत्र याबद्दल श्रीमती अर्चना बदर व श्रीमती सुनंदा हिलाले यांनी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय महामुनी, गोपाळ सितारे, महेश काटकर, बाळासाहेब कारंडे, शमीमबानो खान, हजरत शेख आदि. शिक्षक उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांच्यातील कलेला वाव मिळावा विद्यार्थांसाठी आयोजित केलेल्या कार्यानुभव या कलेचे कला सादर करण्यासाठी उपक्रमांचे कौतुक करीत हे विद्यार्थी आपले व आपल्या शाळेचे नाव उंचावतील असा विश्वास शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रीती घाडगे यांनी व्यक्त केला. या कार्यशाळेत विद्यार्थी -विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*