शैक्षणिक

शिस्तप्रिय माणसांमुळे रयत शिक्षण संस्थेने प्रगती केली – सहसचिव प्रिं.डॉ. ज्ञानदेव म्हस्के.

पंढरपूर प्रतिनिधी

पंढरपूर – “रयत शिक्षण संस्थेला देदीप्यमान आणि उज्ज्वल यश मिळवूनदेण्यात समाजातील प्रत्येक घटकाचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. समाजातीलदानशूर घटकाबरोबरच संस्थेच्या शाळा महाविद्यालयातून कर्मवीर भाऊराव पाटीलयांच्या विचार आणि कार्यांनी प्रेरित झालेला शिक्षक आणि शिक्षकेतर वर्गयांचे मोठे योगदान ठरले आहे. रयत चा सेवक कधीही वेळ आणि काळाचे बंधन नपाळता संस्थेच्या हितासाठी झटत असतो. म्हणून रयत शिक्षण संस्था हीनावारूपाला आली आहे.” असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षणविभागाचे सहसचिव प्रिं. डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्तमहविद्यालयात सेवकांच्या सेवानिवृत्ती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून तेबोलत होते. यावेळी मंचावर रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव व सेवानिवृत्तप्राचार्य डॉ. जे. जी. जाधव, सत्कारमूर्ती प्रोफे. डॉ. चांगदेव कांबळे,सत्कारमूर्ती प्रा. बाळासाहेब शिंदे, माजी प्राचार्य डॉ. दादासाहेबसाळुंखे, प्राचार्य डॉ. मधुसूदन बचुटे, प्राचार्य डॉ. तानाजी लोखंडे,जनरल बॉडी सदस्य जे. बी. भायगुडे, हरिदास गायकवाड, कार्यक्रमाचे अध्यक्षमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे आदी मान्यवर उपस्थितहोते. प्रिं. डॉ. ज्ञानदेव म्हस्के पुढे म्हणाले की, “प्रत्येकव्यक्तीच्या आयुष्यात संधी येत असतात, त्या संधीचे सोने प्रत्येकांनीकेले पाहिजे. नोकरी करताना आपल्या प्रत्येकाला एका चाकोरीबद्ध जीवनातूनप्रवास करावा लागतो. आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड घातलेली असते.त्यामुळे त्या इच्छांची पूर्तता सेवानिवृत्तीनंतर केली पाहिजे. पर्यटन,सहल, देवदर्शन, निसर्गदर्शन अशा अनेक बाबी असतात. त्यांची पूर्तताकरण्यासाठी वेळ द्यावा.”

या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव म्हणाले की,“प्रत्येक व्यक्तीचा विचार आणि स्वभाव भिन्न असतो. विचाराच्या पलीकडेजावून आपणास त्या व्यक्तीवर प्रेम करता आले पाहिजे. प्रेम करण्यासाठीत्या व्यक्तीचे व्यक्ती असणे महत्त्वाचे असते. समोरच्या व्यक्तीला मानदेणे आणि त्यांचा सन्मान करण्याची आपली भावना असली की माणसे जवळ येतात.आपल्या प्रत्येकाच्या मनात बंधू-भावाची आणि प्रेमाची भावना असली पाहिजे.समाजातील सर्व भेदभाव नष्ट होण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. ” अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणालेकी, “सेवानिवृत्ती मुळे शाखेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. एखादासेवक तीस-पस्तीस वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त होत असताना तेवढ्या वर्षाचासेवेतील अनुभव लुप्त होत असतो. शाळा महाविद्यालयातून मोठ्या प्रमाणातसेवक निवृत्त होतात, तेवढ्या प्रमाणात नवीन सेवकांची भरती होत नाही.त्यामुळे उपलब्ध सेवकांवर कामाचा अतिरिक्त ताण येतो. प्रत्येक सेवक हामहत्त्वपूर्ण असतो. त्याची भूमिका त्या ठिकाणी महत्त्वाची असते.” या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय ‘सेवककल्याण समिती’चे चेअरमन डॉ. उमेश साळुंखे यांनी केले. या कार्यक्रमातसेवानिवृत्ती निमित्ताने प्रोफे. डॉ. चांगदेव कांबळे व प्रा. बाळासाहेबशिंदे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.शाल, कर्मवीरांची चांदीची मोहर, पुष्पहार व श्रीफळ असे सत्काराचे स्वरूपहोते. यावेळी अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, प्राचार्य डॉ. दादासाहेबसाळुंखे, प्रा. डॉ. रमेश शिंदे, पर्यवेक्षक प्रा. युवराज आवताडे, प्रा.राहुल मुसळे, ओंकार कांबळे, डॉ. स्नेहल शिंदे आदींनी मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमास सिनिअर, ज्युनिअर, व्होकेशनल विभागातील शिक्षक-शिक्षकेतरसेवक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कुबेर गायकवाड यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. नामदेव पाटील यांनीमानले.

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*🙏* सबस्क्राईब करा* 🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!