आरोग्य

दुष्काळजन्य परिस्थितीवर तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आ. आवताडे यांचे आदेश

24 मराठी न्यूज पंढरपूर प्रतिनिधी

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री.समाधानदादा आवताडे साहेब यांचे अक्षरशः जेसीबी मधून पुष्पवृष्टी करून हलगीच्या गगनभेदी निनादामध्ये जंगी स्वागत करण्यात आले….दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चाराडेपो व पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु होण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आ. आवताडे यांचे आदेश प्रतिनिधी – खरीप हंगामातील पावसाची ओढ लक्षात घेता तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांचे पशुधन जतन करण्यासाठी चाराडेपो व जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी पाणी टँकर सुरु करण्याची मागणी आता जोर धरत आहे. गावभेट दौऱ्यावर असताना आ आवताडे यांच्याकडे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी चाराडेपो आणि पाणी टँकर सुरु करण्याची मागणी केली असता तालुक्यातील पशुसंवर्धन, महसूल व कृषी विभागांनी या मागणीच्या अनुषंगाने सर्वेक्षण येत्या ४ ते ८ दिवसांमध्ये करुन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आ समाधान आवताडे यांनी दिले आहेत. सदर मागणी संदर्भात आपली भूमिका मांडताना पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपले पशुधन जगविण्यासाठी बाहेरील तालुक्यातून ४००० ते ५००० हजार रुपयांनी प्रतीटन दराने ऊस आणावा लागत आहे. या सर्व बाबींच्या विचार करुन आ आवताडे यांनी सोलापूर येथे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये ही मागणी केली होती. सदर मागणीच्या सकारात्मक पूर्ततेसाठी व शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी हे प्रस्ताव लवकरात-लवकर सादर करावेत असेही आ आवताडे यांनी सांगितले आहे.आमदार आपल्या दारी या अभियानाअंतर्गत आ आवताडे यांनी तालुक्यातील तब्बल ४२ प्रशासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत शुक्रवार पासून गावभेट दौरा सुरु केला आहे. आ आवताडे यांनी शनिवारी तालुक्यातील अकोले, शेलेवाडी, गणेशवाडी, आंधळगाव, लेंडवे चिंचाळे, शिरसी, गोणेवाडी, खुपसंगी, जालिहाळ, हाजापूर या गावांचा गावभेट दौरा करुन जनतेच्या अडी-अडचणी व समस्या जाणून घेतल्या. वरील अनेक गावांमध्ये महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना विजेचा लपंडाव व पुरेश्या डी.पी.अभावी होणारा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून देताच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार डी. पी. बसविण्यासाठी कोणतीही हयगय करू नका अथवा शेतकऱ्यांना वेठीला धरू नका असा सक्त सूचना आ आवताडे यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. तसेच रीतसर वीज कनेक्शन कोटेशन भरून सुद्धा अनेकांना गेल्या अनेकांना अंधारात दिवस काढावे लागत असल्यामुळे आ आवताडे यांनी महावितरण विभागावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. येत्या ८ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या विजेच्या संदर्भात असणाऱ्या सर्व समस्यांचा निपटारा करा असा आदेशही त्यांनी दिला.त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी सुलभ वाट नसल्यामुळे त्यांना आपली शेती नाईलाजास्तव पडीक ठेवावी लागत आहे. या अनुषंगाने आ आवताडे यांच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली व भूमी-अभिलेख, स्थानिक तलाठी व गावातील इतर जेष्ठ मंडळी यांची उपसमिती स्थापन करुन सदर प्रश्न लवकरात-लवकर निकाली काढण्याचेही आ आवताडे यांनी आदेशीत केले आहे. शेतात जाण्यासाठी बांधावरून तसेच हद्दीवरुन अनेक तंटे निर्माण झाल्यामुळे पाणंद रस्त्याचा मोठा निधी खर्ची पडणे मागे राहिले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान पेन्शन योजनेसाठी जे शेतकरी लाभार्थी आहेत परंतु गेल्या अनेक हप्त्यापासून ते या योजनेपासून वंचित आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही व मार्गदर्शन करण्याचेही या दौऱ्यादरम्यान सूचित करण्यात आले.गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असलेल्या व तालुक्यातील ४० गावांसाठी पाणी प्रश्नावर जीवनदायीनी असणाऱ्या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आ आवताडे यांच्या अथक प्रयत्नांतून सुरु होऊन अनेक गावांमध्ये या योजनेचे पाणी पोहचले असून उर्वरित गावांसाठी सुद्धा या योजनेचे पाणी पोहचवण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून. तसेच या योजनेतील पाणी लाभार्थी गावांना दररोज मिळण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याचेही आ आवताडे यांनी आदेशीत केले आहे. शेलेवाडी, लेंडवे चिंचाळे या गावांमधून अनेक विद्यार्थी व इतर नागरिक शिक्षण आणि निरनिराळ्या कामानिमित्त मंगळवेढा व सांगोला या तालुक्याच्या ठिकाणी जाणे-येणे करत असतात त्यामुळे या गावांवरून एस. टी. बस सुरु करण्याची मागणी झाल्यानंतर आ आवताडे यांनी एस. टी. महामंडळ विभागाला याबाबतीत सकारात्मक विचार करुन एस. टी. सुरु करणेबाबत सूचित केले आहे.

*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!