आहार हा आरोग्यावर प्रभाव टाकणारा महत्त्वाचा घटक आहे :- प्रा सुनील ननवरे
पंढरपूर – प्रतिनिधी
“श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ केवळ पूजेचा ग्रंथ नसून त्यामध्ये मानवी जीवनातील सर्व प्रश्नासंबंधाने मार्गदर्शनकेले आहे. हा ग्रंथ समस्त मानव कल्याणाचे सूत्र मांडणारा असून राजकारण, धर्मकारण, अर्थकारण, शिक्षण आणिआरोग्य या संबंधी या ग्रंथात महत्त्वाचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. या ग्रंथात भगवान श्रीकृष्णानी आहार शास्त्रावरकेलेले भाष्य आपल्या दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी महत्त्वाचा मापदंड ठरणारा आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी हा ग्रंथसमजून घेवून आहार आणि आरोग्य या बाबीचे आचरण करावे. आहार हा आरोग्यावर प्रभाव टाकणारा महत्त्वाचा घटकआहे.” असे प्रतिपादन योगशिक्षक प्रा सुनील ननवरे यांनी केले,रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात रुसा काम्पोनंट आठ अंतर्गतहेल्थ अँड हायजीन’ या विषयावर आयोजित आठ दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत ‘आहार नियंत्रण व आरोग्य’ याविषयावर ते मार्गदर्शन करत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हेहोते.प्रा. सुनील ननवरे पुढे म्हणाले की, श्रीमद भगवद गीतेने त्रिगुणात्मक आहाराची माहिती दिली आहे. ‘राजस,तामस आणि सात्विक’ हे प्रकार होत. सात्विक आहार हा मानवासाठी अत्यंत उपयुक्त आहार असून तो इतर आहारापेक्षाअधिक श्रेष्ठ आहे. मीठ, मिर्ची आणि मसाले ही औषधे आहेत. त्याचा औषध म्हणूनच उपयोग व्हायला हवा. सध्यामोठ्या प्रमाणात मसालेदार पदार्थाचा आहारात वापर होत असल्याने त्याचे पचन संस्थेवर विपरीत परिणाम होत आहेत.सध्याचे पिढी फास्टफूड अन्नाचे मोठ्या प्रमाणात सेवन करत असल्याने विविध आजारांना बळी पडताना दिसतात.व्यायाम आणि आहाराचा आरोग्याची थेट संबंध असतो. त्यामुळे आरोग्यदायी जीवनासाठी युवकांनी सजग राहिलेपाहिजे.”या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय शारीरिक संचालक डॉ. सचिन येलभर यांनी करून दिला. याकार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, उपप्राचार्य राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ.बाळासाहेब बळवंत, अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. हनुमंत लोंढे, हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ.फैमिदा विजापुरे, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. समाधान माने. राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुशीलकुमार शिंदे, डॉ. रमेशशिंदे, डॉ. धनंजय साठे, सिनिअर महाविद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे यांनी मानले. ______________________
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*