आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात शहर व तालुका काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न
पंढरपूर तालुका प्रतिनिधी
राज्यातील आणि देशातीलआरक्षणच संपुष्टात आणण्याचा प्रयत्न, भाजपा सरकार करत आहे. त्यांच्या जवळच्या सहाभांडवलदारांना सर्व ठेके दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुका काँग्रेसमध्ये गट तट आहेत, हे मुळीच मान्य नाही. काँग्रेस पक्षहा एकच गट काँग्रेसमध्ये आहे. लोकशाही राबविणारा देशातील सर्वात मोठा पक्ष काँग्रेस आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि आ. प्रणिती शिंदे यांनी दिली. त्या मंगळवारी पंढरपूर तालुका काँग्रेसच्या आढावा बैठकीस आल्या होत्या, यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे, शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, यांच्यासह जिल्हा आणि तालुका काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.मागील काही वर्षांपूर्वी काँग्रेसचे हाताचा पंजा चिन्ह दिसताच, नागरिक काँग्रेसला निवडून देत होते. यामुळे काँग्रेस पक्षाने बूथ यंत्रणेवर लक्ष दिले नव्हते
पूर्वीची निवडणूक आणि आत्ताच निवडणूक यात मोठा फरक झाला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मागील महिन्यापासून देशभर आढावा बैठकी घेण्याचा आदेश दिला आहे. याचाच एक भाग म्हणून बूथ यंत्रणा स करण्यासाठी पंढरपूरमध्ये आ. प्रणिती शिंदे यांनी आढाव बैठकी घेण्याचा आदेश दिला आहे. याचाच एक भाग म्हणून बूथ यंत्रणा सज्ज करण्यासाठी पंढरपूरमध्ये आ. प्रणिती शिंदे यांनी आढावा बैठक घेतली. येथील धनश्री हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली
या बैठकीस ज्येष्ठ नेत्या सूनेत्राताई पवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सूनंजय पवार,ज्येष्ठ नेते बजरंग बागल, देवानंद गुंड पाटील, सुहास भाळवणकर, किशोर महाराज जाधव, प्रशांत शिंदे, जिल्हा काँग्रेस ग्राहक संरक्षण सेलचे जिल्हाध्यक्ष संग्राम जाधव, मिलिंद अढवळकर आदींसह जिल्हा व पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना आ. प्रणिती शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना जागृत केले. काँग्रेस पक्ष नागरिकांच्या मनामनात आहे. पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याजवळ जाणे गरजेचे आहे. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ निराधार योजना या दोन योजनांवर अधिकाधिक नागरिक जगत आहेत. नागरिकांना यासाठी मदत केल्यास, काँग्रेस पक्ष पुन्हा तळागाळात पोहचू शकतो, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. पंढरपूरचा आमदार आणि सोलापूरचा खासदार हे दोन्ही यावेळी महाविकास आघाडीचेच असती असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com