पंढरपूर श्री नंदकुमार देशपांडे
मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसा निमित्ताने पांडुरंग परिवार व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2023 सोलापूर जिल्हा निवड चाचणीचे उद्घाटन मा.आ.आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते यांच्या हस्ते करण्यात आले. या निवड चाचणीमध्ये 700 हून अधिक पैलवानांनी सहभाग घेतला.65 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सध्या सर्वत्र निवड चाचणी सुरू आहे. पंढरपुरात भव्य दिव्य प्रमाणात मर्दानी रांगड्या कुस्ती स्पर्धेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी सोलापूर जिल्ह्याची निवड चाचणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात संपन्न होत आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परीषद, पांडुरंग परिवार व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या निवडचाचणीचे आयोजन करण्यात आले आहे
वजनी गट, मातीतली कुस्ती, मॅटवरील कुस्ती आणि खुला गट अशा चार भागांमध्ये निवड चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे. यातील विजेता कुस्ती खेळाडु महाराष्ट्र केसरीसाठी सोलापूर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे.या जिल्हा निवड चाचणीमध्ये माती गट व गादी गट 57 किलो, 61 किलो, 70 किलो, 74 किलो, 79 किलो, 86 किलो, 92 किलो, 97 किलो, 85 ते 125 किलो तसेच कुमार गट 45 किलो, 48 किलो, 51 किलो, 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 71 किलो, 80 किलो, 92 किलो, 110 किलो या वजनी गटात स्पर्धा होत आहे.या स्पर्धेसाठी माती विभागासाठी दोन मैदान व गादी गटासाठी दोन मैदान तयार केलेले असून या स्पर्धेसाठी 700 हून अधिक पैलवानांनी सहभाग घेतला असून साडेतीनशेहून अधिक कुस्त्या दोन दिवसात होणार आहेत.या वेळी मा.दिनकरभाऊ मोरे, शिवानंद पाटील, दाजी भुसनर, वसंतनाना देशमुख, हरिषदादा गायकवाड, राजुबापु गावडे, दिलीप आप्पा घाडगे, दिलीप चव्हाण, सतिशराव मुळे, वामनतात्या बंदपटे, दगडु आण्णा धोत्रे, लक्ष्मण शिरसट, नागेश भोसले, कैलास खुळे, सोमनाथ डोंबे, प्रणव परिचारक, लक्ष्मण धनवडे, रोहन परिचारक, भास्कर कसगावडे, बाळासाहेब देशमुख, भगवान चौगुले, पंडीत भोसले, औदुंबर वाडदेकर, तानाजी वाघमोडे, दिलीप गुरव, सुदाम मोरे, माऊली हळणवर, अरूण घोलप, संतोष भिंगारे, पंडीत शेंबडे, प्रशांत देशमुख, अरूण नागटिळक, बाळासाहेब माळी, बाळासो यलमर, दादा मोटे, शिवदास ताड, रा.पा.कटेकर, तसेच जिल्हा कुस्ती संघटनेचे भरत मेकाले, रावसाहेब मगर, विलास कंडरे, सर्जेराव चवरे, वामन उबाळे, ज्ञानदेव पावले, मारूती वाकडे, आण्णासाहेब ढाणे, कुस्तीपंच व पांडुरंग परिवारातील तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, कुस्ती प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते..उमेश परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली यास्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रणव परिचारक, प्रा.सुभाष मस्के, बालाजी चव्हाण, दादा धोत्रे, विजय भुसनर, विश्वनाथ आळगे, सोमनाथ सुर्वे, दिगंबर कांबळे, सादीक शेख, शहाजी चव्हाण, महादेव कुसुमडे, सिराज शेख, हणमंत भुसनर, अक्षय वाडकर, संदिप कळसुले, हर्षल कदम व पांडुरंग परिवारातील सदस्य इ. परिश्रम घेत आहेत.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com