देवस्थान व नगर पालिकेच्या मोकळ्या जमिनीवर वनीकरण प्रकल्प राबवावेत- डॉ. नीलमताई गोऱ्हे
पंढरपूर तालुका प्रतिनिधी
पंढरपूर, – मंदिर समिती व नगरपालिका यांच्या मालकीच्या असलेल्या व वापरात नसलेल्या जमिनीचा विकास करण्यासाठी सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून वनीकरण प्रकल्प राबवावेत करावी. अशा सूचना विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी दिल्या. राज्याच्या विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. यावेळी तहसिलदार सुशिल बेल्हेकर,मुख्याधिकारी अरविंद माळी तसेच मंदिर समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्याकडून घेतली.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com