पाणी व्यवस्थापन काळाची गरज – डॉ. प्रसन्नकुमार पाटील
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय(स्वायत्त) पंढरपूर येथे एक दिवसीय पाणी व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन भूगोलशास्त्र विभागाकडून करण्यात आले. रुसा कंपोनंट ८ अंतर्गत भूगोलशास्त्र विभागामध्ये करण्यात आले होते. पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन व त्याचे घटक स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे असे मत प्रा.डॉ. प्रसन्नकुमार पाटील यांनी मत या कार्यशाळेच्या निमित्ताने व्यक्त केले. शेततळे, पाण्याचा पुनर्वापर बंधाऱ्याचे प्रकार यासारख्या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रा मध्ये डॉ. विजय गायकवाड यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण या विषयी बोलताना पृथ्वीवरील पाण्याची उपलब्धता २.७ टक्के वापरण्या योग्य आहे. महाराष्ट्रातील उपलब्ध जलसंपदा मानदेशी पर्जन्य छायेचा प्रदेश, भारतातील दुष्काळी परिस्थिती, कृत्रिम पाउस, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, छतावरील पाणी गोळा करून जमिनीत सोडणे पावसाच्या पाण्याचे भूजल पुनर्भरण, कूपनलिका पुनर्भरण, शासनाच्या योजना पाणी फाऊंडेशन सारख्या संस्थांचे कार्य यावर सविस्तर विवेचन केले. या कार्यशाळेसाठी अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चंद्रकांत खिलारे होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पाण्याला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे असे मत व्यक्त केले. यावर्षी सरसरी पेक्षा कमी पाउस पडला आहे तसेच एल निनो च्या प्रभावामुळे पर्जन्य कमी आहे तसेच हवामान बदलामुळे पर्जन्य वितरणावर विपरीत परिणाम होत आहे. पाण्याचा थेंब ना थेंब वाचवला पाहिजे असे मत त्यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ.बी.एस.नाईकनवरे यांनी केले तर पाहुण्याचे ओळख डॉ. चंद्रकांत काळे यांनी केले. तर आभार डॉ.भारत सुळे यांनी मांडले. या कार्यशाळेसाठी विदयार्थी संख्या मोठ्या संख्येने उपस्थित होती.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com