आरोग्य

पंढरी नगरी महाआरोग्य शिबिरात 11 लाख वारकऱ्यांची होणार आरोग्य तपासणी

पंढरपूर तालुका प्रतिनिधी

तीन दिवस कार्तिकी वारीच्या निमित्ताने येणाऱ्या वारकऱ्यांची महाआरोग्य शिबिरात सर्वरोग निदान तपासणी करण्यात येणार असून, एकाच ठिकाणी औषधोपचार व विविध तपासण्या करून गरज असल्यास पुढील सर्जरीची सोय सुद्धा मोफत केली जाणार असल्याची माहिती पुणे परिमंडळ उपसंचालक डॉ राधाकृष्ण पवार यांनी दिली.याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत उपस्थित होते.महाआरोग्य शिबिरासाठी पंढरपूरच्या ६५ एकर क्षेत्रात आरोग्य मंडप करण्यात आला असून, या ठिकाणी जवळपास दोन हजार डॉक्टरांच्या मदतीने व किमान ५००० स्वयंसेवक शिवसैनिकांच्या मदतीने दहा लाख रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.तपासणी केल्यानंतर रुग्णांना सर्व प्रकारच्या औषधी मोफत दिल्या जाणार आहेत. चष्याचे वाटप केले जाणार आहे. सोनोग्राफी एक्सरे, हृदयरोग तपासणी, शुगर तपासणी आदी तपासणी मोफत केली जाणार आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी मोफत जेवणाची, नाश्त्याची सोय करण्यात आली आहे

जवळपास तीन हजार शौचालय उभी करण्यात आली आहे.दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व अजितदादा पवार हे दोघेही या कार्यक्रमाच्याउद्घाटनाला येणार आहेत. आरोग्यमंत्री प्रा. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखालीया आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी आषाढी वारीतही अशाच प्रकारचे शिबिर तीन ठिकाणी घेण्यात आले होते. तुळजापूर येथे नवरात्रात तीन दिवस मोठे आरोग्य शिबीर घेण्यात आले. आरोग्य शिबिराची दखल ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली असून लाखो भाविकांना एकाच वेळी मोफत आरोग्य सेवा देण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याचे यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी सांगितले . यावेळी ६५ एकरातील महाआरोग्य शिबिराच्या स्थळाच्या पाहणी प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे,महा आरोग्य शिबिराचे नोडल अधिकारी, डॉ. दीपक धोत्रे, सबनोडल अधिकारी डॉ. निखिल जोशी, साख्यिकी अधिकारी हेमंत पवार आदी उपस्थित होते.महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. सतीश हरिदास ओ.एस.डी.प्रविण लटके ओ एस डीमुन्ना भोसले शहर प्रमुख, शिवाजी बाबर तालुका प्रमुख, डी.एस. सावंत उपजिल्हा प्रमुख, स्विय सहाय्यक संजय ढेरे, संजय बंदपट्टे शहर संघटक, आदी परिश्रम घेत आहेत.

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!